नवीन मार्गांवर जाऊन नवीन कीर्तिमान होतात…मोदी यांनी दिला विरोधकांना मोठा संदेश

| Updated on: May 28, 2023 | 1:55 PM

New Parliament Building Inauguration : नवनवीन वाटेवर चालल्यानेच नवनवीन विक्रम होतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. मोदी यांनी आपल्या भाषणात कोणाचे नाव न घेता विरोधकांनाही संदेश दिला.

नवीन मार्गांवर जाऊन नवीन कीर्तिमान होतात...मोदी यांनी दिला विरोधकांना मोठा संदेश
नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली : संसदेची नवीन इमारत नव्या भारताचे प्रतिक बनली आहे. नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाला गर्व वाटत आहे. या नवीन संसद भवनात संस्कृती आहे अन् संविधानसुद्धा आहे. आता नवा भारत नवीन उद्दिष्टे ठरवत आहे. नव्या भारतात नवा उत्साह आहे, नवा प्रवास आहे. नवा विचार, नवी दिशा, नवी दृष्टी आहे अन् नवा संकल्प आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. संसदेच्या नवीन भवनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नवीन मार्गावर जाऊन नवीन कीर्तिमान होत असल्याचे सांगत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर काही न बोलता सर्वच सांगून दिले. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या नऊ वर्षींची कामगिरीही मांडली.

प्रत्येक देशाच्या विकास यात्रेत काही क्षण असे येतात, जे कायमस्वरुपी अमर होतात. आज 28 मे 2023 चा दिवस असाच शुभअवसर आहे. देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा अमृतमहोत्सव साजरा करतोय, अन देशाला नवीन संसद भवन मिळत आहे. हे नवीन भवन विकसित भारताच्या संकल्पाची सिद्धी पाहणार आहे. हे फक्त एक भवन नाही. 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षाच प्रतिबिंब आहे. नवीन संसद भवन हे जगाला भारताच्या दृढ संकल्पाच संदेश देणारं मंदिर आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले मोदी

  • गेल्या नऊ वर्षांत गरीबांचे कल्याण झाले आहे. आज ही भव्य इमारत तयार होत असताना गरीबांसाठी चार कोटी घरे झाल्याचे मला समाधान आहे. ११ कोटी शौचालयांची निर्मिती झाली आहे. चार लाखपेक्षा जास्त रस्ते तयार झाले आहे.
  • संसदेची नवी इमारत या प्रयत्नांचे जिवंत प्रतीक बनली आहे. आज नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. या वास्तूमध्ये वारसा, वास्तुकला, कला आणि कौशल्य आहे. यामध्ये संस्कृती आहे तसेच संविधानाचा आवाज आहे.
  • लोकसभेचा आतील भाग हा राष्ट्रीय पक्षी मोरावर आधारलेला दिसतो. राज्यसभेचा भाग हा राष्ट्रीय फूल कमळावर आधारित आहे आणि राष्ट्रीय वृक्ष वट देखील संसदेच्या प्रांगणात आहे. आपल्या देशाच्या विविध भागांतील विविधतेचा या नव्या इमारतीत समावेश करण्यात आला आहे.
  • आज संपूर्ण विश्व भारताचा संकल्पाला आदर आणि उमेदच्या भावनेने पाहत आहे.
  • भारत पुढे जातो तेव्हा विश्व पुढे जाते. नवीन भवन भारताच्या विकासाबरोबर विश्वाच्या विकासाचे आवाहन करणार आहे.
  • भारत हा केवळ लोकशाहीचा सर्वात मोठा देश नाही, तर लोकशाहीची माताही आहे. जागतिक लोकशाहीचाही तो पाया आहे. लोकशाही हा आपला ‘संस्कार’, विचार आणि परंपरा आहे.