
नवी दिल्लीः नॅशनल हेराल्ड (National Herald) केसप्रकरणी राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजेच ईडी समोर हजर होणार आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या या प्रकरणामुळे काँग्रेसकडून दिल्लीत मोठ्या आंदोलनाची तयारी करत होते. त्यासाठी काँग्रेसने पक्ष कार्यालयापासून ते ईडीच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली होती, मात्र दिल्ली पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली.
गांधी नहीं डरेंगे ED के फरमान से, न तानाशाह के अभिमान से।
— Congress (@INCIndia) June 12, 2022
नॅशनल हेरॉल्ड हे प्रकरण 2012 मध्ये प्रचंड चर्चेत आले होते, भाजपचे नेत सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याप्रकरणी याचिका दाखल करुन राहुल गांधी यांच्या आरोप केला होता.
त्यांनी आरोप केला होता की, काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने यंग इंडियन लिमिटेड (वायआयएल) च्या माध्यमातून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे अधिग्रहण केले होते. याप्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी 2015 पासून जामिनावर आहेत.
पोलिसांच्या मतानुसार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अकबर रोडवर आंदोलनाला बसण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र नवी दिल्लीतील काही परिसरातील प्रचंड गर्दीमुळे काँग्रेसच्या या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. या गोष्टीबद्दलच सोमवारी सकाळी काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला पत्रकार परिषद घेणार आहेत.
दिल्ली पोलिसांची परवानगी मिळण्यापूर्वीच काँग्रेस नेता सचिन पायलट यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते, राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे खासदार, काँग्रेसचे सदस्य आणि प्रमुख नेते ईडी कार्यालयात जाणार आहेत.
सचिन पायलट यांनी सांगितले होते की, देशाने गेल्या सात ते आठ वर्षात बघितले आहे की, मुख्य केंद्रीय संस्थांचा कशा प्रकारे दुरुपयोग केला जात आहे. सचिन पायलय यांनी भाजपला उपरोधिकपणे टोला लगावत म्हटले होते की, ईडी म्हणजे केंद्र सरकारची सगळ्यात प्रिय असणारी ही संस्था आहे.
त्याचवेळी, कोरोना संसर्गातून बरे झालेल्या सोनिया गांधी यांना ईडीने समन्सची नवी तारीख दिली आहे.
सोनिया गांधी यांना ईडीकडून 23 जून रोजी सूचना देण्यात आली होती, तर त्यापूर्वीच, म्हणजेच 8 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता त्या हजर होऊ शकत नाहीत.
नॅशनल हेरॉल्ड हे प्रकरण 2012 मध्ये प्रचंड चर्चेत आले होते, भाजपचे नेत सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याप्रकरणी याचिका दाखल करुन राहुल गांधी यांच्या आरोप केला होता. त्यांनी आरोप केला होता की, काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने यंग इंडियन लिमिटेड (वायआयएल) च्या माध्यमातून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे अधिग्रहण केले होते. याप्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी 2015 पासून जामिनावर आहेत.
याप्रकरणी स्वामी यांच्याकडून आरोप लावण्यात आला होता की, दिल्लीतील बहादूर शहा जफर मार्गावरील हेराल्ड हाऊसची 2 हजार कोटींची इमारतीवर कब्जा घेण्यासाठी हे प्रकरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कटांतर्गत यंग इंडियन लिमिटेडला TJL च्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.