Neet Paper Leak : दिल्ली कोर्टाने CBI ला आरोपींच्या हस्तांक्षराचे नमूने घेण्यास दिली परवानगी..

नीट पेपर फुटीच्या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयने देशभरातून एकून १३ आरोपींना अटक केली आहे, या प्रकरणातील सर्वाधिक आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत.

Neet Paper Leak : दिल्ली कोर्टाने CBI ला आरोपींच्या हस्तांक्षराचे नमूने घेण्यास दिली परवानगी..
neet paper leak case
| Updated on: Jul 23, 2026 | 8:18 PM

नीट पेपर फुटीच्या प्रकरण एकीकडे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना शिक्षा केली जाईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. दुसरीकडे आज दिल्ली हायकोर्टात सीबीआयने या प्रकरणातील एक आरोपी मनिषा हवालदार हीच्या हस्तांक्षराचे नमूने घेण्यास परवानगी मागितली. दिल्ली स्पेशल कोर्टाने आरोपींचे हस्ताक्षराचे नमूने घेण्यास सीबीआयला परवानगी दिली आहे.

नीट युजी पेपर लिक प्रकरणात सीबीआयला अनेक हस्तांक्षरांचा पुरावे आढळले आहेत. या हस्तांक्षराची मूळ आरोपींच्या हस्ताक्षराशी जुळणी करण्यासाठी आरोपींच्या हस्ताक्षराचे नमूने सीबीआयाला हवेत आहेत. त्यामुळे दिल्लीच्या कोर्टात सीबीआयने कोर्टाकडे आरोपी मनिषा हवालदार हीच्या हस्ताक्षरांचे नमूने जमा करायचे असून त्यास परवानगी मागितली होती. सीबीआयच्या विशेष कोर्टाने आज आरोपींच्या हस्ताक्षराचे नमुने गोळा करण्यास परवानगी दिली आहे.

विशेष न्यायाधीश अजय मेहता यांच्यासमोर आरोपी मनिषा संजय हवालदार हीचे हस्ताक्षराचे नमूने आम्हाला या प्रकरणात सापडलेल्या हस्ताक्षराशी जुळवायचे आहेत अशी याचिका सीबीआयने केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली.

सरकारी पक्षाने आज कोर्टात सांगितले की मनिषा हवालदार हीच्या भौतिक शास्राचे प्रश्न सह आरोपी मनिषा मांढरे आणि तसेच आणखी समर्पित फिजिक्सचे प्रश्नसंच आणखी एक आरोपी तेजस हर्षद कुमार शाह याला शेअर केल्याचा आरोप आहे.

तपासात मांढरे हिच्या मोबाईल फोनमधून फिजिक्सच्या प्रश्नांचे लिखित नोट्स रिकव्हर करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात सीबीआयने हवालदार हीच्या हस्ताक्षराचे नमूने जमा करण्यास दिल्ली कोर्टाने ३० मे रोजीच मंजूरी दिली आहे. अतिरिक्त हस्ताक्षर नमूने प्रत्येक लेखी पुराव्याशी जोडून पाहण्यासाठी गरजेचे असल्याने त्यास मंजूरी देण्यात यावी अशी मागणी सीबीआयने आज कोर्टात याचिका दाखल करुन केली होती.

Follow Us