NEET UG Counselling 2026 चे वेळापत्रक जाहीर, या तारखेपासून सुरु होणार रजिस्ट्रेशन

Medical Counselling Committee (एमसीसी) ने नीट युजी 2026 काऊन्सिलिंगचे शेड्युल जारी केले आहे. या कार्यक्रमानुसार पहिल्या फेरीसाठी रजिस्ट्रेशन 5 ऑगस्ट 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.

NEET UG Counselling 2026 चे वेळापत्रक जाहीर, या तारखेपासून सुरु होणार रजिस्ट्रेशन
neet ug counselling 2026
| Updated on: Aug 01, 2026 | 8:28 PM

NEET UG Counselling Schedule Released: मेडिकल काऊन्सिलिंग कमिटीने ( Medical Counselling Committee) नीट युजी 2026 काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जारी केले आहे. एमसीसीच्या वतीने जारी केलेल्या या कार्यक्रमानुसार पहिला फेरीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन 5 ऑगस्ट 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटचा तारीक 12 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.ही काऊन्सिलिंग 15 टक्के ऑल इंडिया कोटा आणि एमसीसीच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या दुसऱ्या जागांवर एमबीबीएस, बीडीएस आणि बीएससी नर्सिंग कोर्समध्ये प्रवेशासाठी आयोजित करण्यात आली आहे.

नीट युजी 2026 ची 3 मे रोजी झालेली मूळ परीक्षा पेपर फुटी झाल्यानंतर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या 21 जून 2026 रोजी ही फेर परीक्षा घेण्यात आली होती. या फेरपरीक्षेनंतर, 16 जुलै 2026 रोजी NEET UG 2026 चे निकाल जाहीर करण्यात आले होते. यात एकूण 11.21 लाख उमेदवार पात्र ठरले असून, ऑगस्ट 2026 साठी समुपदेशनाची (counseling) तयारी सुरू असतानाच आता काऊन्सिंगचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us