
देशातील आणि अनेक राज्यातील इतिहासातील पुस्तकात मोठ्या बदलाला सुरूवात झाली आहे. मुघलांचा इतिहास कमी झाला आहे. तर दुसरीकडं काही घोडचुका सुद्धा झाल्याचे दिसून येत आहे. केरळ राज्यातील शाळेच्या पुस्तकात अशीच मोठी चूक झाली आहे. महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी ही चूक करण्यात आली आहे. तर केरळ सरकारने ही चूक कबुल करत ती दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा केला आहे. इयत्ता 4 वीच्या पुस्तकात, टीचर्स हँडबुकमध्ये ही चूक समोर आली. त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस हे इंग्रजांना घाबरून जर्मनीला पळाल्याचा दावा करण्यात आला होता.
सदस्य मंडळांवर कारवाई
नेताजी सुभाषचंद्र बोस हे इंग्रजांना घाबरून जर्मनीला पळाल्याचा दावा शिक्षकांना देण्यात आलेल्या पुस्तकात करण्यात आला होता. हे इयत्ता 4 ची पुस्तक होतं. त्यावर मग राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं. केरळचे शिक्षणमंत्री व्ही.शिवनकट्टी यांनी सोमवारी यांनी ही चूक कबुल केली. त्यांनी ही त्रुटी झाल्याचे मान्य करत या पुस्तक मंडळाच्या सदस्यांवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यांना भविष्यात मंडळात स्थान न देण्याची घोषणा पण त्यांनी केली.
ऐतिहासिक चूक
शिक्षणमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली. त्यात ही ऐतिहासीक घोडचूक झाल्याचे मान्य केले. केरळ राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा एक सदस्य यासाठी जबाबदार असल्याचे समोर आले आहे. शिवनकुट्टी यांनी सदर चूक तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले. तसेच बाजारात अथवा शाळेतील शिक्षकांपर्यंत पोहचलेली पुस्तकं परत मागवलेली आहे. तर दुरुस्त केलेली पुनःप्रकाशित पुस्तकं लवकरच पुरवण्यात येणार आहे. तर ऑनलाईन जे पुस्तक उपलब्ध आहे, त्यात बदल करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
ABVP आक्रमक
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या सर्व प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. या पुस्तकात अजून अनेक चुका आहेत. त्या कधी दुरुस्त करणार असा सवाल एबीव्हीपीने विचारला आहे. परिषदेचे राष्ट्रीय सचिव श्रवण बी राज यांनी इतिहासातील अशा चुका कशा होतात असा सवाल केला आहे. डावा गट देशाची एकता आणि अखंडता तोडू इच्छित असल्याचा आरोप त्यांनी केला.