AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-US conflict : इराणची विनाअट माघार, शेवटी ट्रम्प जिंकलेच, अमेरिकेचा सर्वात मोठा विजय

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर इराणने माघार घेतली आहे, अमेरिकेला मोठं यश मिळालं आहे. आता इराणने अमेरिकेला नवा प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये इराणने कोणतीही अट ठेवलेली नाहीये.

Iran-US conflict : इराणची विनाअट माघार, शेवटी ट्रम्प जिंकलेच, अमेरिकेचा सर्वात मोठा विजय
Iran-US conflictImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 16, 2026 | 9:03 PM
Share

युद्धविरामानंतर देखील स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंदच आहे. होर्मूजच्या सामुद्रधुनीमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे इराणने होर्मूज सामुद्रधुनीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. एका दिवशी केवळ 15 च जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी इराणकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने देखील स्ट्रीट ऑफ होर्मूजचा रस्ता ब्लॉक केला आहे. अमेरिका आणि इराणच्या युद्धनौका या मार्गावर आमने-सामने आहेत. त्यामुळे आता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मात्र हा वाद जरी दोन देशांमध्ये असला तरी देखील याचा फटका हा संपूर्ण जगाला ऊर्जा संकटाच्या रुपाने बसत आहे.

दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे अमेरिकेसोबत चर्चा झाल्यानंतर आता इराणकडून अमेरिकेला एक नवा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावरून आता असा अंदाज लावला जात आहे की, लवकरच स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी खुले होणार आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूज तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांसाठी खुले झाल्यास कच्च्या तेलाचे दर देखील मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात रॉयटर्सकडून दावा करण्यात आला आहे. रॉयटर्सच्या दाव्यानुसार अमरिकेसोबत झालेल्या चर्चेनंतर इराणने अमेरिकेला आता नवा प्रस्ताव दिला आहे.

आपल्या नव्या प्रस्तावात इराणने असं म्हटलं आहे की, आम्ही होर्मूजच्या सामुद्रधुनीमधून विशेषतः ओमानच्या बाजूने जहाजांना येण्या-जाण्यास परवानगी देऊ शकतो. आम्ही जहाजांवर कोणताही हल्ला करणार नाही, जहाजं ओमानच्या बाजूने सामुद्रधुनीमधून सुरक्षितपणे प्रवास करू शकतील. भविष्यातील अमेरिकेसोबतचा संघर्ष टाळण्यासाठीच इराणने आता अमेरिकेला हा प्रस्ताव दिल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यांनी आपल्या प्रस्तावामध्ये हे अजूनही स्पष्ट केलेलं नाही की, ते सामुद्रधुनीमध्ये पेरलेले सुरुंग हटवणार की नाही? तसेच आता अमेरिका हा प्रस्ताव स्विकारणार का हे पहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान स्ट्रीट ऑफ होर्मूज  ओपन झाल्यानंतर सर्वच देशांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारताला देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...