तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय आहात तर केंद्र सरकारचे हे नवे नियम तुमच्यासाठी !

| Updated on: Feb 25, 2021 | 2:55 PM

व्यवसाय करण्यासाठी सोशल मीडियाचं भारतात स्वागत आहे. पण सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्लॅटफॉर्म असावा.

तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय आहात तर केंद्र सरकारचे हे नवे नियम तुमच्यासाठी !
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय आयटी व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया कंपनी भारतात व्यवसाय करू शकते. पण त्याचा गैरवापर होता कामा नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. सोशल मीडियावरुन अनेक वेळा चुकीची माहिती पसरवली जाते. यामुळे सुसंस्कृत समाजात तेढ निर्माण होत आहेत. अशा तक्रारीही समोर आल्या आहेत. (New social Media and OTT Rules ravishankar prasad and prakash javadekar press conference)

रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, नियमांचं उल्लंघन करून सोशल मीडियावर गोष्टी व्हायरल केल्या जात आहेत. व्यवसाय करण्यासाठी सोशल मीडियाचं भारतात स्वागत आहे. पण सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्लॅटफॉर्म असावा. द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. दहशतवादी सोशल मीडियाचा वापरही करत आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये मंत्र्यांनी काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या

नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार…

– कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट 24 तासात काढली गेली पाहिजे

– मुख्य तक्रार अधिकारी नियुक्त करणं आवश्यक आहे

– पोस्ट शेअर करणाऱ्याची सगळी माहिती असली पाहिजे

– एका नोडल अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात येईल

– नवीन सोशल मीडिया नियम तीन महिन्यांत लागू केले जातील

– यूजर्सचं व्हेरिफिकेशन महत्त्वाचं

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले की, प्रत्येक माध्यमांसाठी हे नियम आवश्यक असणार आहे. इतकंच नाही तर ओटीटी कंपन्यांनाही वृत्त माध्यमांप्रमाणं नियमन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

खरंतर, मीडिया स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे. चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड आहे. पण ओटीटीसाठी अशी कोणतीही यंत्रणा नाही. म्हणून यंत्रणा तयार केली पाहिजे. डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या आणि अफवा पसरवण्याचा कोणताही अधिकार नाही. यामुळे यासाठी कठोर नियम आखले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. (New social Media and OTT Rules ravishankar prasad and prakash javadekar press conference)

संबंधित बातम्या –

Bharat Bandh : मोठी बातमी! देशभरात ‘या’ दिवशी सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद राहणार; CAIT ची माहिती

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याची महिलेशी हुज्जत, राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख, मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन चोपलं

India vs England 3rd Test 2nd Day Live | भारताला चौथा धक्का, अजिंक्य रहाणे आऊट

(New social Media and OTT Rules ravishankar prasad and prakash javadekar press conference)