India vs Canada Issue | खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूवर NIA ची मोठी Action

India vs Canada Issue | NIA ने थेट Action घेतली आहे. भारत आणि कॅनडामधील संबंध सध्या प्रचंड ताणले गेले आहेत. दोन्ही देश दररोज परस्पराविरोधात पावलं टाकत आहेत. दोन्ही देशाच्या व्यापारी संबंधांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

India vs Canada Issue | खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूवर NIA ची मोठी Action
nia action on khalistan terrorist gurpatwant singh pannu
| Updated on: Sep 23, 2023 | 3:47 PM

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या विरोधात भारतात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) टीम पन्नूची संपत्ती जप्त करण्यासाठी पोहोचली आहे. पन्नू सिख फॉर जस्टिसचा प्रमुख आहे. भारताला हवा असलेला तो मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. पन्नू नेहमीच भारताविरोधात गरळ ओकत असतो. कॅनडातून तो खलिस्तानी आंदोलन पुढे नेत होता. भारतात त्याच्याविरोधात दहशतवादाच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. NIA ची टीम पन्नूशी संबंधित ठिकाणांवर छापेमारीसाठी पोहोचली होती. अमृतसर आणि चंदीगडमध्ये एजन्सीची टीम उपस्थित आहे. संबंधित ठिकाणी छापेमारी सुरु आहे. अमृतसरमध्ये पन्नूशी संबंधित जमिनी जप्त करण्यात आल्या आहेत.

भारत-कॅनडा वादानंतर गुरपतवंत पन्नू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जस्टिन ट्रूडोच्या भारत विरोधी वक्तव्यांच गुरपतवंत सिंह पन्नूने स्वागत केलं. पन्नूने कॅनडात राहणाऱ्या हिंदूंना धमक्या दिल्या आहेत. त्यांना कॅनडा सोडून जाण्याचा इशारा दिला. अनेक वर्षांपासून तपास यंत्रणा पन्नूचा शोध घेत आहेत. चंदीगडमध्ये प्रतिबंधित सिख फॉर जस्टिसचा (एसएफजे) संस्थापक आणि गुरपतवंत सिंह पन्नूच्या घराबाहेर संपत्ती जप्तीची नोटीस चिकटवण्यात आली आहे.

जस्टिन ट्रुडो हेच करत नाहीयत

कॅनडात राहून गुरपतवंत सिंह पन्नू भारतविरोधी कारवाया करत आहे. भारत आणि कॅनडामधील संबंध सध्या प्रचंड ताणले गेले आहेत. यामागे खलिस्तानी दहशतवादी हाच मुद्दा आहे. कॅनडा सरकार गुरपतवंत सिंह पन्नू सारख्या दहशतवाद्यांच समर्थन करत, त्यांना पाठिशी घालतं. त्यांच्यावर कारवाई करावी ही मोदी सरकारची मागणी आहे. पण जस्टिन ट्रुडो हेच करत नाहीयत. त्यामुळेच दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.