या राज्यात निपाह व्हायरसचा रुग्ण सापडला, संपूर्ण राज्यात हायअलर्ट

निपाह व्हायरसचा रुग्ण सापडल्याने हाहाकार माजला असून संपूर्ण राज्याला हायअलर्ट करण्यात आले आहे.रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

या राज्यात निपाह व्हायरसचा रुग्ण सापडला, संपूर्ण राज्यात हायअलर्ट
high alert across the state
| Updated on: Jun 11, 2026 | 6:13 PM

केरळात या वर्षातील निपाह व्हायरसची पहिली केस सापडली आहे. याची माहिती गुरुवारी समोर आली आहे. हा रुग्ण ४३ वर्षांचा असून तो कोझिकोड येथील रहाणारा आहे. राज्य सरकारने या प्रकरणातील रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण राज्यात हायअलर्ट देण्यात आला आहे. केरळ राज्यात आठ वर्षातील हे सहावे संक्रमण आहे.

या संशयित रुग्णाला हलका ताप आल्यानंतर त्याला खाजगी हॉस्पिटल भरती करण्यात आले होते. त्यानंतर कोझिकोड मेडिकल कॉलेजात त्याची रवानगी करण्यात आली. केरळमचे आरोग्यमंत्री के. मुरलीधरन यांनी सांगितले की रुग्ण अनेक लोकांच्या संपर्कात आला होता. रुग्णालयाच्या स्टाफ आणि त्याच्या संपर्कात आलेल्या संभाव्य लोकांना क्वॉरंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे, सध्या या प्रकरणात घाबरण्याची काहीही गरज नाही. साल २०१८ नंतर केरळम येथे सहाव्यांदा निपाहचे संक्रमण झाले आहे. गेल्या वेळेला दोन वर्षांआधी २०२४ मध्ये दोन केस सापडल्या होत्या. त्यातील एकाचा मृ्त्यू झाला होता.

निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव कसा झाला ?

केरळचा या रुग्णाने अलिकडेच एक गोदाम भाड्याने घेतले होते आणि त्याची स्वच्छता त्याने स्वत:च केली होती. संशय आहे की याच दरम्यान त्याला निपाहची लागण झालेली असावी. निपाह व्हायरस मुख्य रुपाने फ्रूट बॅट ( फळ खाणाऱ्या वटवाघाळामुळे ) मुळे पसरतो.

आता पुढे काय ?

या रुग्णाचा रुट मॅप तयार केला जात आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. त्यांना ओळखून त्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे. NIV चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्यात सर्वत्र काळजी घेतली जात आहे.

मलेशियात निपाहची पहिली केस

साल १९९८-९९ दरम्यान मलेशियाच्या सुंगाई निपाह गावांत या व्हायरसची पहिल्यांदा ओळख झाली होती. त्याच गावाच्या नावावर या व्हायरसचे नाव ठेवण्यात आले. हा व्हायरल वघवाघळापासून पसरला होता. वघवाघळांपासून तो डुकरांमध्ये पसरला आणि डुकरांच्या फार्ममध्ये काम करणाऱ्या लोकांना तो झाला होता.

मलेशियात १०० हून अनेक लोकांचा मृत्यू

मलेशियात २६५ लोक या आजाराने संक्रमित झाले होते. १०० हून अधिक लोकांची या आजाराने मृत्यू झाला होता. संक्रमण रोखण्यासाठी सरकारने १० लाखाहून अधिक डुकरांचा खात्मा करावा लागला होता. यामुळे मलेशियाच्या पोर्क इंडस्ट्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

मलेशियानंतर निपाह व्हायरस सहा देशात

मलेशियानंतर निपाह व्हायरस सहा देशात पसरला होता. या देशात बांग्लादेश, भारत, सिंगापुर आणि फिलीपाईन्स यांचा समावेश होता. कंबोडिया आणि थायलंड येथेही या व्हायरसचे काही रुग्ण सापडले होते. मात्र, येथे जास्त फैलाव झाला नाही.

भारतात २००१ मध्ये पहिला निपाहची केस

भारतात २००१ मध्ये प.बंगालच्या सिलिगुडी येथे पहिल्यांदा निपाहचा रुग्ण सापडला होता. तेव्हा ६६ केस उघडकीस आल्या आणि त्याची ४५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २००७ मध्ये बंगालच्या नादिया येथे पाच केस सापडल्या आणि सर्वांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये केरळात निपाहचा प्रवेश झाला. राज्यात गेल्या ८ वर्षात सहा वेळा निपाहच्या केस सापडल्या आहेत.

भारतात वेगळा पॅटर्न

मलेशियातील व्हायरल मुख्य रुपाने डुक्करांच्या द्वारे पसरला होता. मात्र, भारत आणि बांगलादेशातील अनेक प्रकरणात हा व्हायरल वटवाघळांच्याद्वारे पसरला होता.

Follow Us