ग्रीन हायड्रोजनवर ट्रक, बसेस आणि कार चालवणार, नितीन गडकरींनी सांगितला प्लॅन

| Updated on: Dec 03, 2021 | 9:25 AM

शहरातील सांडपाणी आणि घनकचऱ्यापासून (Solid Waste) ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करता येईल, असं नितीन गडकरी म्हणाले.

ग्रीन हायड्रोजनवर ट्रक, बसेस आणि कार चालवणार, नितीन गडकरींनी सांगितला प्लॅन
नितीन गडकरी
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ग्रीन हायड्रोजनवर (Green Hydrogen) बसेस, ट्रक आणि कार चालवण्याचा प्लॅन असल्याचं म्हटलं आहे. शहरातील सांडपाणी आणि घनकचऱ्यापासून (Solid Waste) ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करता येईल, असं गडकरी म्हणाले. ऑईल रिसर्च इन्स्टिट्यूट, फरिदाबाद यांच्याकडून ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार बनवण्यात आली असून ती विकत घेतली असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. ते नॅशनल समिट ऑन फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये बोलत होते.

ग्रीन हायड्रोजनवर आधारित कार दिल्लीत चालवणार

नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीमध्ये ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार चालवणार असल्याचं म्हटलं. या कार्यक्रमात त्यांनी ग्रीन हायड्रोजनसंदर्भात मार्गदर्शन केलं.

सांडपाणी विकून नागपूरला 325 कोटी मिळतात

नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलताना नागपूरमधील एका प्रकल्पाची माहिती दिली. नितीन गडकरींच्या पुढाकारानं नागपूरमधील 7 वर्षांपासून सुरु असलेल्या प्रकल्पाबद्दल गडकरींनी सांगितलं. नागपूरमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. महाराष्ट्र सरकारच्या वीज प्रकल्पाला सांडपाणी विकून नागपूरला 325 कोटी रुपये मिळतात. कोणतीही गोष्ट टाकाऊ नसते. नेतृत्त्वाकडं असणाऱ्या दूरदृष्टीवर सगळं अवलंबून असतं. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तुम्ही कचऱ्यातून आर्थिक कमाई करु शकता, असंही ते म्हणाले. आता आपल्याला वाया जाणाऱ्या पाण्यातून आणि सांडपाण्यातून आर्थिक कमाई करता येते का हे पाहणार आहे. प्रत्येक नगरपालिकेकडे अशा प्रकारचं पाणी उपलब्ध असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडरकींचं संपूर्ण भाषण

आपण ग्रीन हायड्रोजनला पर्यायी इंधन म्हणून वापरू शकतो. त्यावर बसेस, ट्रक आणि कार देखील चालवता येतील, असं नितीन गडकरी म्हणाले. मी ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार विकत घेतली आहे तीन दिल्लीत चालवणार आहे. आऊट ऑफ बॉक्स जाणाऱ्या संकल्पना स्वीकारायला लोक लवकर तयार होत नाहीत, असं नितीन गडकरी म्हणाले.

इतर बातम्या:

Karnataka Omicron: कर्नाटकनं पारा चढवला! ओमिक्रॉन रुग्णाच्या संपर्कातले 5 जण पॉझिटिव्ह, संक्रमणाचा विरोधाभास उघड

Prashant Kishor: काँग्रेसचा 10 वर्षात 90 टक्के पराभव, विरोधकांचं नेतृत्वं करणं हा काही काँग्रेसचा दैवी अधिकार नाही; प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल

 

Nitin Gadkari Said he have plan to run truck bus and car with green hydrogen