आता हवेतच नष्ट होणार शत्रूंचं ड्रोन; ‘भार्गवास्त्र’ चाचणी यशस्वी

ओडिशातील गोपाळपूरमधील सीवर्ड फायरिंग रेंज या ठिकाणी स्वदेशी बनावटीच्या 'भार्गवास्त्र' अँटी-ड्रोन सिस्टीमची चाचणी पार पडली, ही चाचणी यशस्वी ठरली आहे.

आता हवेतच नष्ट होणार शत्रूंचं ड्रोन; भार्गवास्त्र चाचणी यशस्वी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2025 | 7:37 PM

मोठी बातमी समोर येत आहे, भारतानं आपल्या स्वदेशी बनावटीच्या ‘भार्गवास्त्र’ अँटी-ड्रोन सिस्टीमची यशस्वी चाचणी केली आहे. यामुळे भारताची संरक्षण प्रणाली आणखी मजबूत झाली आहे. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडनं ही अँटी-ड्रोन सिस्टीम विकसीत केली आहे. ‘भार्गवस्त्र’ची यशस्वी चाचणी ही ड्रोनच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.

आज ओडिशातील गोपाळपूरमधील सीवर्ड फायरिंग रेंज या ठिकाणी स्वदेशी बनावटीच्या ‘भार्गवास्त्र’ अँटी-ड्रोन सिस्टीमची चाचणी पार पडली, ही चाचणी यशस्वी ठरली आहे. या चाचणीमध्ये सर्व निश्चित करण्यात आलेल्या लक्ष्याचा वेध घेण्यात आला आहे.’मेक इन इंडिया’मोहिमेचं हे सर्वात मोठं यश मानलं जातं आहे.पहिल्या दोन चाचण्यांमध्ये प्रत्येकी एक रॉकेट डागण्यात आलं, तर तिसऱ्या चाचणीमध्ये सॅल्व्हो मोडमध्ये दोन सेकंदांच्या अंतराने दोन रॉकेट डागण्यात आले. चारही रॉकेटनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. ‘भार्गवास्त्र’ची यशस्वी चाचणी ही ड्रोनच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.

‘भार्गवास्त्र’ची वैशिष्ट

ही प्रणाली 6 ते 10 किलोमीटर अंतरावरून लहन आणि प्रचंड वेग असलेल्या ड्रोनचा शोध घेऊन त्यांना नष्ट करू शकते. यामुळे आता ड्रोन हल्ले टाळण्यासाठी या यंत्रणेचा भारताला मोठा फायदा होणार आहे. दरम्यान भारतानं पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला होता, पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं हे सर्व हल्ले परतून लावले, जर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली तर भारताला आता भार्गवास्त्र या अँटी-ड्रोन सिस्टीमची मोठी मदत होणार आहे.

दरम्यान ओडिशातील गोपाळपूरमधील सीवर्ड फायरिंग रेंज या ठिकाणी स्वदेशी बनावटीच्या ‘भार्गवास्त्र’ अँटी-ड्रोन सिस्टीमची चाचणी पार पडली, ही चाचणी यशस्वी ठरली आहे. यामुळे आता भारताची संरक्षण प्रणाली अधिक मजबूत झाली आहे. ड्रोनचे हल्ले सहज परतून लावण्यासाठी ड्रोनला नष्ट करण्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.  भारताला मोठं यश मिळालं आहे.