JEE Main 2022 : नोंदणीची प्रक्रिया सुरू, यंदा नवा पॅटर्न; काय आहे विशेष? वाचा सविस्तर

| Updated on: Mar 02, 2022 | 11:31 AM

NTA JEE Main 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Main 2022)साठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार जेईई मेन 2022 अर्ज सबमिट करण्यासाठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.inला भेट देऊ शकतात आणि शेवटची तारीख 31 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.

JEE Main 2022 : नोंदणीची प्रक्रिया सुरू, यंदा नवा पॅटर्न; काय आहे विशेष? वाचा सविस्तर
एनटीए (प्रातिनिधिक छायाचित्र)
Image Credit source: https://nta.ac.in/
Follow us on

NTA JEE Main 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Main 2022)साठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार जेईई मेन 2022 अर्ज सबमिट करण्यासाठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.inला भेट देऊ शकतात आणि शेवटची तारीख 31 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. फी जमा करण्याची शेवटची तारीख देखील 31 मार्च आहे. यावर्षी एनटीएने जेईई मेन अर्ज आणि परीक्षा पद्धतीमध्ये अनेक बदल केले आहेत. परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार (GoI)ने कार्यक्षम, पारदर्शक, संस्था नोंदणी कायदा (1860) अंतर्गत स्वतंत्र, स्वायत्त आणि स्वयंपूर्ण प्रीमियर चाचणी संस्था म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ची स्थापना केली आहे. NTAने एक प्रणाली तयार केली आहे जी शिकवण्याला (शिक्षकांकडून), शिकणे (विद्यार्थ्यांकडून) आणि मूल्यांकन (पालक आणि संस्थांद्वारे) प्रोत्साहन देते.

जेईई मेन 2022 नोंदणी : अर्ज कसा करावा?

1 : अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
2 : होमपेजवर दिसणार्‍या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
3 : अर्ज भरण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे.
4 : तुमच्या मूलभूत तपशीलांसह नोंदणी करा आणि क्रेडेन्शियल्स तयार करा.
5 : आता फॉर्म आणि फी सबमिट करा.

अर्ज दुरुस्तीची संधी नाही…

जेईई मेन 2022चे पहिले सत्र 16 ते 21 एप्रिल दरम्यान, तर दुसरे सत्र 24 ते 29 मे दरम्यान होणार आहे. परीक्षा यंदा एप्रिल आणि मेमध्ये 4 ऐवजी 2 सत्रात घेतली जाणार आहे. नोंदणीच्या दरम्यान, आता फक्त सत्र 1 (एप्रिल) दिसेल, आणि सत्र 2 (मे)साठी अर्जाची विंडो काही वेळाने लाइव्ह होईल. अधिकृत निवेदनात म्हटले आहे, की कोणत्याही परिस्थितीत, अर्जातील दुरुस्तीची सुविधा कोणत्याही टप्प्यावर दिली जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक फॉर्म भरावा.

आणखी वाचा :

एमपीएससी अध्यक्षांच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेटी, कशा पार पडल्या परीक्षा?

स्वस्त MBBS चा युक्रेन पॅटर्न अभ्यासणार, त्यानुसार बदल करणार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचं आश्वासन!

SSC | दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा एलिमेंटरीशिवाय देता येणार इंटरमिजिएट परीक्षा, परीक्षार्थींची संख्या वाढण्याची शक्यता