Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या अटकेला ब्रेकच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, सर्व FIR दिल्लीत हस्तांतरीत

| Updated on: Aug 10, 2022 | 4:49 PM

सर्व प्रकरणे एकत्र जोडून ती दिल्लीला हस्तांतरित करावी अशी आमची मागणी आहे, या प्रकरणातील पहिली एफआयआर दिल्लीत नोंदवण्यात आली होती, असा युक्तीवाद त्यांच्याकडून करण्यात आला.

Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या अटकेला ब्रेकच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, सर्व FIR दिल्लीत हस्तांतरीत
Nupur Sharma
Image Credit source: Social Media
Follow us on

नवी दिल्ली : नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्याविरोधात दाखल असलेले सर्व खटले दिल्लीला हलवण्याच्या (Supreme Court) याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांच्या विरुद्ध देशातील विविध राज्यांमध्ये नोंदवलेल्या सर्व एफआयआर (केस) एकत्र करून ते दिल्लीला (Delhi) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. नुपूर शर्मांच्या जीवित आणि मालमत्तेला असलेला धोका लक्षात घेऊन न्यायालयाने हा आदेश दिला आहे. झुबेरच्या प्रकरणी जारी करण्यात आलेल्या आदेशाची दखल घेत न्यायालयाने नूपूर प्रकरणात हा आदेश दिला आहे. सुनावणीदरम्यान नुपूर शर्माचे वकील मनिंदर सिंग यांनी सांगितले की आम्ही झुबेर प्रकरणात दिलेल्या आदेशानुसारच सर्व खटले एकाच ठिकाणी हस्तांतरित करण्याची मागणी करत आहोत. सर्व प्रकरणे एकत्र जोडून ती दिल्लीला हस्तांतरित करावी अशी आमची मागणी आहे, या प्रकरणातील पहिली एफआयआर दिल्लीत नोंदवण्यात आली होती, असा युक्तीवाद त्यांच्याकडून करण्यात आला.

धोका लक्षात घेऊन कोर्टाचा निर्मण

सुनावणीदरम्यान पश्चिम बंगालच्या वकिलाने युक्तीवाद केला की दिल्लीत प्रथम एफआयआर अज्ञात व्यक्तीविरुद्ध नोंदवण्यात आला होता. तसेच नावासह पहिली एफआयआर महाराष्ट्रात नोंदवण्यात आली होती. त्यानंतर नुपूर यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला की की, माझ्या अशिलाच्या जीवाला धोका आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. यावर सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मांना मोठा दिलासा दिला आहे. या वस्तुस्थितीची पूर्ण काळजी घेऊन कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

नुपूर शर्मा यांच्या विधानानंतर मोठा वाद

नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत एका टीव्ही शो दरम्यान एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतरच हा वाद देशभरात पेटला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हा मुद्दा बराच गाजला होता. त्यानंतर भाजपवर सडकून टीका होत होती. तर मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरत नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध नोंदवत आंदोलनं केली होती. याच प्रकरणावरून अनेक ठिकाणी हिंसाही घडली होती. देशभरातलं राजकीय वातावरण या प्रकरणांने ढवळून निघालं होतं. त्यानंतर नुपूर शर्मा यांच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी एफ आय आर नोंदवण्यात आल्या होत्या. हा वाद आता थेट सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला होता. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने यावर दोन्ही बाजू ऐकून घेत महत्त्वपूर्ण निर्णय नोंदवलेला आहे आणि नुपूर शर्मा यांना मोठा दिलासा देत त्यांच्याविरुद्धचे सर्व एफआयआर हे दिल्लीला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.