इकडे खुर्ची संकटात, तिकडे मुख्यमंत्र्याने वयाच्या 56 व्या वर्षी केलं लग्न; आज दिल्लीत…
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी वयाच्या 56 व्या वर्षी पत्रकार निधी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केलं आहे. एका बाजूला त्यांच्या सरकारवर राजकीय संकट गडद होत असताना, त्यांनी एक्सवर पोस्ट करत विवाहाची घोषणा केली. दिल्लीत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. या रिसेप्शनला राहुल गांधींसह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये राजकीय संकट उभं राहिलं आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मंत्रिमंडळ विस्तार केल्याने त्यांच्यावर पक्षातील 24 आमदार नाराज आहेत. या आमदारांनी उघड नाराजी बोलून दाखवली असून बैठका सुरू केल्या आहेत. काही मागण्याही या आमदारांनी ठेवल्या आहे. त्यामुळे अब्दुल्ला सरकार अस्थिर झाल्याचं मानलं जात आहे. असं असताना उमर अब्दुल्ला यांनी मात्र वयाच्या 56 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट करून आपण दुसरं लग्न केल्याचं जाहीर केलं आहे. तसेच आज दिल्लीत रिसेप्शन ठेवल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या खासगी आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे. अब्दुल्ला यंनी पत्रकार निधी राजदान यांच्याशी विवाह केला आहे. स्वत: अब्दुल्ला यांनी एक्सवरून विवाहाची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी दोघांचे फोटोही शेअर केले आहेत. काल एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली, अशी कमेंट त्यांनी या फोटोवर केली आहे. या पोस्टमध्ये निधी राजदान यांनाही टॅग केलं आहे. ही पोस्ट समोर येताच दोघांचं लग्न झाल्याचं स्पष्ट झालं. आता लग्नाच्या आनंदाच्या निमित्ताने दिल्लीत आज रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.
Omar Abdullah
राहुल गांधी ते पवन खेडा
दिल्लीच्या पृथ्वीराज रोडवरील जम्मू-काश्मीर हाऊसमध्ये डिनरसाठी केवळ 71 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे या कार्यक्रमावरून चर्चा रंगली होती. या पाहुण्यांमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि महबूबा मुफ्ती आदी मोठ्या नावांचा समावेश आहे. या शिवाय डेरेक ओ’ब्रायन, कपिल सिब्बल, निशिकांत दुबे आणि पवन खेड़ा आदींनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. लग्नाची पुष्टी झाल्यानंतर आता रिसेप्लशन सोहळा अधिक खास झाला आहे.
फोटो आले आणि…
उमर अब्दुल्ला यांनी एक्सवर त्यांचा आणि निधी राजदान यांचा फोटो शेअर केला आहे. एका नव्या प्रवासाची सुरुवात कालपासून झाल्याचं त्यात त्यांनी म्हटलं आहे. या पूर्वी दोघांच्या विवाहाच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा अब्दुल्ला यांच्याकडून कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आली नव्हती. आता त्यांनी स्वत: फोटोसह ट्विट केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
कोण आहेत निधी?
निधी राजदान यांचा जन्म 11 एप्रिल 1977मध्ये झाला. त्या 49 वर्षाच्या आहेत. निधी राजदान या प्रसिद्ध पत्रकार आहेत. निधी या मूळच्या काश्मिरी पंडित कुटुंबातील आहेत. त्यांचं आजोळ बडगाममध्ये आहे. त्यांचा जन्म दिल्ली झाला आणि तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. लेडी श्री राम कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतलं. प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक निलेश मिश्रा यांच्याशी 2005 सोबत त्यांचं लग्न झालं होतं. 2007मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता.