Diwali 2026 : टीव्ही ते गिझर, ऐन दिवळीत महागाईचं संकट, तब्बल 7 टक्क्यांनी… सामान्यांच्या खिशाला बसणार मोठी झळ!

इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या उपकरणांच्या किमती वाढवलेल्या आहेत. दिवाळीच्या अगोदरच वेगवेगळ्या कंपन्यांनी हा निर्णय घेतलाय.

Diwali 2026 : टीव्ही ते गिझर, ऐन दिवळीत महागाईचं संकट, तब्बल 7 टक्क्यांनी... सामान्यांच्या खिशाला बसणार मोठी झळ!
diwali 2026 price hike
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2026 | 8:34 PM

Diwali 2026 Price Hike : दिवळीचा सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. हा सण लक्षात घेता बाजारपेठा गजबजल्या आहेत. कपडे, दिवे, पणत्या, तसेच मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी काही लोक सोने खरेदी करतात. सोबतच घरात वेगवेगळ्या वस्तूही आणल्या जातात. याच काळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होते. या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. दरम्यान, तुम्हीही या दिवाळीला टीव्ही, ग्रीझर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण या वस्तू आता महागल्या आहेत.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत 3 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढवली

इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या उपकरणांच्या किमती वाढवलेल्या आहेत. दिवाळीच्या अगोदरच वेगवेगळ्या कंपन्यांनी हा निर्णय घेतलाय. आकड्यात सांगायचे झाल्यास इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत 3 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हायर, एलजी, ब्लू स्टार यासारख्या कंपन्यांच्या उपकरणांचा यात समावेश आहे. हॅवल्स कंपनीनेही आपल्या उपकरणांच्या किमतीत डिसेंबर महिन्यापर्यंत 5 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात आहे.

Loading...

मिठाईची किंमत 15 टक्क्यांनी महागली

विशेष म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनिक उपकरणेच नव्हे तर मिठाईच्या किमतीतही यंदा वाढ करण्यात आलीय. काही ठिकाणी मिठाईची किंमत 15 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. सध्या ड्राय फ्रुट्सची किंमत वाढलेली आहे. सोबतच साखर, दुधाचाही भाव वाढलेला आहे. त्यामुळे मिठाईची किंमतही वाढली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवालीत इलेक्ट्रॉनिक उपकरणाची खरेदी करायची असेल तर अगोदर उपकरणांचा वाढलेला भाव लक्षात घेऊनच त्याबाबत विचार करणे फायदेशीर ठरू शकते.

दरम्यान, यंदा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत वाढ का झाली? असे विचारले जात आहे. सध्या जागतिक पातळीवरील घडामोडी, युद्ध यामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला. उपकरमांचे सुटे भाग, वाहतूक खर्च याचा खर्च वाढला. त्यामुळेच ही महागाई आल्याचे बोलले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us