आता ऑनलाईन फसवणूक, सायबर फ्रॉडला टाटा बाय बाय, तुमचं बँक खातं झालं सुरक्षित, आरबीआयची सर्वात मोठी घोषणा

बँक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे, आता ऑनलाईन फसवणुकीला तसेच सायबर फ्रॉडला आळा बसणार आहे. बँक खाती अधिक सुरक्षित झाली आहेत. आरबीआयकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

आता ऑनलाईन फसवणूक, सायबर फ्रॉडला टाटा बाय बाय, तुमचं बँक खातं झालं सुरक्षित, आरबीआयची सर्वात मोठी घोषणा
आरबीआयचा नवा नियम
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 8:22 PM

सध्याच्या काळात ऑनलाइन बँकिंग (Online Banking) आणि डिजिटल पेमेंटची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. ज्या प्रमाणात ऑनलाईन बँकिंग आणि डिजिटल पेमेंटचे व्यवहार वाढत आहेत, त्याचप्रमाणात सायबर फ्रॉड आणि ऑनलाईन फसवणुकीच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र आता ऑनलाईन फसवणुकीला लगाम घालण्यासाठी भारताची केंद्रीय बँक असलेल्या आरबीआयने मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहा तासांमध्ये रिपोर्टिंगचा नवा नियम लागू केला आहे. ऑनलाईन फसवणुकीला आळा घालणं, सायबर फ्रॉडचे प्रकरणं कमी करणं, हा यामागचा उद्देश आहे. यामुळे आता जे ग्राहक ऑनलाईन पेमेंटचे व्यवहार करतात, त्यांची बँक खाती अधिक सुरक्षित होणार आहेत.

काय आहे नवा नियम?

Loading...

पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार आरबीआयने सहा तासांमध्ये रिपोर्टिंगचा नवा नियम लागू केला आहे. बँकेने आपल्या या नव्या नियमाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे की, नॉन -बँकिंग पेमेंट सिस्टम ऑपरेटर (PSO) ला सायबर हल्ला किंवा इतर काही फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सहा तासांच्या आत एका विशिष्ट फॉरमॅटमध्ये रिझर्व्ह बँकेला माहिती देणं बंधनकारक असणार आहे. सेंट्रल बँकेच्या या नव्या नियमाबाबत बोलताना तज्ज्ञांकडून असं मत व्यक्त करण्यात आलं आहे की, यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर हल्ल्यांना आळा बसू शकतो. जर ऑनलाईन फसवणुकीची माहिती आरबीआयला लवकरात लवकर कळाली तर तातडीने ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या लोकांवर कारवाई करणं शक्य होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान टळू शकतं, ग्राहकांचे बँक अकाउंट अधिक सुरक्षित होतील.

या नव्या नियमा अतर्गत आरबीआयने नॉन -बँकिंग पेमेंट सिस्टम ऑपरेटर्सला फसवणुकीचा रिपोर्ट दाखल करण्यासाठी सहा तासांचा वेळ दिला आहे. सहा तासांच्या आत अशा प्रकरणाचा रिपोर्ट सेंट्रल बँकेकडे करणं बंधनकारक असणार आहे. यामुळे वेळेत कारवाई होऊन, ऑनलाईन फसवणूक टाळता येणार आहे. यामुळे आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँक खाती सुरक्षित होणार आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us