
इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाइट हॅमरसाठी अमेरिकन एअर फोर्सने भारताची हवाई हद्द वापरल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अमेरिकेने शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री इराणच्या फॉर्डो, नतांज आणि इस्फाहान या अण्विक प्रकल्पांवर हल्ले केले. अमेरिकेने त्यासाठी खास आपलं B-2 स्पीरिट बॉम्बर विमान वापरलं. हे तिन्ही अण्विक प्रकल्प समूळ नष्ट करण्यासाठी 13,600 किलो वजनाचे GBU-57 हे शक्तीशाली बॉम्ब टाकले. अमेरिकेने इराणवरील या हल्ल्यासाठी भारतीय हवाई हद्दीचा वापर केल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. पण भारत सरकारने रविवारी या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याच स्पष्ट केलय.
भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरो PIB ने हे दावे, चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ही खोटी, तथ्यहीन माहिती असल्याच म्हटलं आहे. ऑपरेशन मिडनाइट हॅमरसाठी अमेरिकेने भारतीय हवाई हद्दीचा वापर केला नाही, असं पीआयबीने म्हटलं आहे. “इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेने भारतीय एअरस्पेसचा वापर केला, रविवारच्या हल्ल्याचा भारताचा सहभाग आहे” असे दावे सोशल मीडिया X वर करण्यात आले होते. म्हणून PIB ने स्पष्टीकरण देऊन हे सर्व दावे खोडून काढले. अमेरिकेने ना भारताची हवाई हद्द वापरली, ना यात भारत सरकारचा कुठला सहभाग आहे, हे PIB ने स्पष्ट केलं.
Several social media accounts have claimed that Indian Airspace was used by the United States to launch aircrafts against Iran during Operation #MidnightHammer #PIBFactCheck
❌ This claim is FAKE
❌Indian Airspace was NOT used by the United States during Operation… pic.twitter.com/x28NSkUzEh
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 22, 2025
फॅक्ट चेकमध्ये काय म्हटलय?
यूएस जॉइंट चीफ ऑफ स्टाफ चेअरमनच्या पत्रकारपरिषदेचा पीआयबीने हवाला दिला. अमेरिकन विमानांनी कुठला पर्यायी मार्ग निवडला, त्याची माहिती यूएस जॉइंट चीफ ऑफ स्टाफने दिली. त्यामुळे सोशल मीडियावरील भारतीय सहभागाच्या दाव्यांना अर्थ नाही. “इराण विरुद्धच्या ऑपरेशन हॅमरसाठी अमेरिकन विमानांनी भारताची हवाई हद्द वापरली असा अनेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन दावा करण्यात आलेला. हा दावा पूर्णपणे खोटा आहे. ऑपरेशन मिडनाइट हॅमरसाठी अमेरिकेने भारताची हवाई हद्द वापरली नाही. अमेरिकेचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल डॅन केन यांनी अमेरिकेन विमानांनी कुठला मार्ग निवडला ते सांगितलय” सरकारच्या फॅक्ट चेक युनिटने X वर ही माहिती दिलीय.