
पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारता काही तरी मोठं करण्याची धास्ती पाकिस्तानला वाटत आहे. तर दुसरीकडे रशियाच्या माध्यमांनी सुद्धा भारत मोठं पाऊल टाकण्याची शक्यता वर्तवली आहे. पाकिस्तानने पाक व्याप्त काश्मीरसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणल्या गेले आहे. भारताने कायदेशीर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्ताने सुद्धा नुकतीच तीच री ओढली आहे. लष्करी आणि संरक्षण दृष्ट्या कोणता देश बलशाली आहे?
भारतीय लष्कर मजबूत
जगभरातील लष्कराची ताकद किती याची पाहणी करणाऱ्या ग्लोबल फायरपॉवरने 2025 साठी नवीन श्रेणी तयार केली आहे. या रँकिंगमध्ये भारत जगातील चौथी सर्वात मोठी लष्करी ताकद असल्याचे म्हटले आहे. तर पाकिस्तान क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर आहे. भारताची सैन्य ताकद पाकिस्तानपेक्षा सरस आणि अधिक आहे हे निर्विवाद सत्य आहे. या इंडेक्समध्ये, क्रमवारीतेत पाकिस्तान पूर्वी 7 व्या क्रमांकावर होता. पण या वर्षाच्या सुरुवातीलाच या देशाची आर्थिक स्थिती आणि लष्कारासाठी निधी अपुरा पडत असल्याच्या कारणाने त्याला टॉप 10 मधून कमी करण्यात आले. तर भारत यादीत चौथ्या स्थानावर आहे.
भारताने संरक्षणावरील खर्चासाठी अर्थसंकल्पात 2025-26 साठी 6.8 लाख कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम 9.5% पेक्षा अधिक आहे. पाकिस्तानने संरक्षणासाठी अर्थसंकल्पात 2,281 अब्ज रुपयांची तरतूद केली आहे. त्यांनी गेल्यावर्षीपेक्षा या खर्चात 159 अब्ज रुपयांची वाढ केली आहे.
लष्करी शक्ती : संख्यात्मक तुलना
सैनिकांची संख्या पाहता भारताकडे 14.55 लाख सक्रिय सैनिक आहेत. तर भारताकडे राखीव सैनिकांची संख्या 11.55 लाखांच्या जवळपास आहे. पाकिस्तानकडे तुलनेने केवळ 6.54 सक्रिय सैनिक आहेत आणि राखीव सैनिकांची तुकडी 5.5 लाख इतकी आहे.
भारताकडे अर्धसैनिकांची संख्या जवळपास 25.27 लाखांच्या जवळपास आहे. तर पाकिस्तानकडे ही संख्या 5 लाख इतकीच आहे. भारताकडे संख्याच नाही तर त्यांचे प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान पण प्रगत आहे.
लष्कर : टँक आणि तोफखान्यात भारताची आघाडी
भारताकडे 4,201 टँक आहे. यामध्ये T-90 भिष्म आणि अर्जुन सारखे अत्याधुनिक रणगाडे आहेत. त पाकिस्तानकडे ही संख्या 2,627 टँक इतकी आहे. यामध्ये अल-खालिद, T-80UD आणि अल-जर्रार यांचा समावेश आहे. भारताकडे 1,48,594 चिलखती वाहनं आहेत. तर पाकिस्तानकडील ही संख्या तोकडी आहे. तर स्वयंचलित तोफखाना प्रणालीत पाकिस्तान भारतापेक्षा उजवा आहे.
हवाईदल : संख्या आणि गुणवत्तेत भारत अग्रेसर
भारताकडे एकूण 2,229 लष्करी विमानं आहेत. तर पाकिस्तानकडे ही संख्या 1 हजार 399 इतकी आहे. भारताकडे लढाई विमानांची संख्या 513 इतकी तर पाकिस्तानकडे हीच संख्या 328 इतकी आहे. एअरटँक्सचा विचार करता भारताकडे ही संख्या 6 आणि पाकिस्तानकडे 4 इतकी आहे. भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई, राफेल, मिराज सारखे आधुनिक फाईटर जेट्स सहभाग आहे. तर पाकिस्तानकडे JF-17 थंडर, F-16 आणि मिराज यांचा समावेश आहे.
नौदल : ‘ब्लू वॉटर’ विरुद्ध ‘ग्रीन वॉटर’
भारताकडे दोन विमानवाहू INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत ही जहाजं आहेत. 293 जहाज संख्येसह भारताची नौसना, पाकिस्तानपेक्षा खूप मोठी आणि अत्याधुनिक आहे. भारताकडे 18 पाणबुड्या तर पाकिस्तानकडे 8 पाणबुड्या आहेत. पाकिस्तानकडे एकही विमानवाहू जहाज नाही.
दोन्ही देश अणवस्त्र सज्ज
पाकिस्ताकडे अंदाजे 150 हून अधिक अणवस्त्र आहेत. तर भारताकडे एक व्यवस्थित न्युक्लिअर शील्ड आहे. दोन्ही देशांनी ‘No First Use’ हे धोरण स्वीकारले आहे.