Amarnath yatra 2022: अमरनाथ यात्रेत घुसखोरीचा प्रयत्न? एका दहशतवाद्याचा बीएसएफकडून खात्मा

जम्मू, सीमा सुरक्षा दलाने सोमवारी मध्यरात्री जम्मू जिल्ह्यातील आरएस पुरा सेक्टरमध्ये भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर (Indo pak border) एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले (Pakistani terrorist killed). बीएसएफच्या 36 बटालियनच्या जवानांनी रविवार आणि सोमवारी मध्यरात्री 12:10 वाजता  आरएस पुरा सेक्टरमधील बाकरपूर सीमा चौकीजवळ ही कारवाई केली. उत्तरीय तपासासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घुसखोराने काळ्या रंगाचा […]

Amarnath yatra 2022: अमरनाथ यात्रेत घुसखोरीचा प्रयत्न? एका दहशतवाद्याचा बीएसएफकडून खात्मा
स्वातंत्र्यदिनीही काश्मीर खोरे धगधगतेच
नितीश गाडगे

| Edited By: सागर जोशी

Jun 27, 2022 | 2:17 PM

जम्मू, सीमा सुरक्षा दलाने सोमवारी मध्यरात्री जम्मू जिल्ह्यातील आरएस पुरा सेक्टरमध्ये भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर (Indo pak border) एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले (Pakistani terrorist killed). बीएसएफच्या 36 बटालियनच्या जवानांनी रविवार आणि सोमवारी मध्यरात्री 12:10 वाजता  आरएस पुरा सेक्टरमधील बाकरपूर सीमा चौकीजवळ ही कारवाई केली. उत्तरीय तपासासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घुसखोराने काळ्या रंगाचा पठाणी ड्रेस परिधान केला होता. आज सकाळी सुमारे 12:10 वाजता,  गस्तीवर असलेल्या बीएसएफ जवानांना सीमा चौकी बकरपूरच्या भागात कुंपणाच्या अलीकडे  संशयास्पद हालचाल जाणवली. एक व्यक्ती कुंपण पार करून भारताच्या हद्दीत घुसखोरी करत असल्याचे जवानांच्या लक्षात आले. अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra 2022) पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

जवानांनी त्याला थांबण्याचे आदेश दिले, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि घुसखोरी कायम ठेवली. परिणामी सैन्याने गोळीबार केला त्यात पाकिस्तानी घुसखोर ठार झाल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले. पहाटेनंतर शोध पथकाने परिसराचा शोध घेतला आणि कुंपणाच्या अगदी जवळ घुसखोराचा मृतदेह आढळला. त्याच्याकडून काहीही सापडले नसल्याने मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सोमवारी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. खोऱ्यातील डोडा जिल्ह्यात शस्त्रे आणि दारूगोळासुद्धा जप्त करण्यात आला आहे, त्यामध्ये  एक चिनी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझिन, 14 जिवंत काडतुसे आणि एक मोबाईल फोन यांचा समावेश आहे. दरम्यान, 30 जूनपासून सुरू होणार्‍या अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांचे सावट असल्याची गुप्तचर विभागाची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

30 जून पासून सुरु होणार अमरनाथ यात्रा

2022 ची अमरनाथ यात्रा लवकरच सुरू होणार आहे. यात्रेची पहिली तुकडी 30 जून रोजी जम्मू येथून रवाना होणार आहे. शहराची सुरक्षा लक्षात घेऊन यात्रेपूर्वी जम्मूमध्ये सुमारे 5000 अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी क्विक रिॲक्शन टीम जम्मूमध्ये तैनात करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी “त्रिनेत्र सुरक्षा कवच” तयार केले आहे, जे प्रत्येक धोक्याला तोंड देण्यास सक्षम आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान प्रत्येक कोपऱ्यावर ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार असून एक नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. दहशतवादाचा धोका लक्षात घेता श्रीनगर ते बालटाल या प्रवासाच्या दोन्ही बाजूंच्या डोंगराळ भागात सीआरपीएफच्या चौक्याही बांधण्यात आल्या आहेत.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें