शिवलिंगावर करू नये ‘या’ गोष्टी अर्पण; जाणून घ्या कारण

भगवान शंकर (Bhagwan shankar) यांना देवांचे देव म्हणून ओळखले जाते. भोळा शंकर, महादेव, शिव अशा वेगवेगळ्या नावाने भक्त त्यांना साद घालतात. महादेवाची भक्ती करून त्यांचा आशीर्वाद मिळावे प्रत्येकासाठीच शक्य आहे. त्यामुळेच तर हिंदू पुराणातील कथेनुसार, ते राक्षसांवर देखील प्रसन्न व्हायचे आणि त्यांनी अनेक राक्षसांना वरदान देखील दिले आहे. त्यांपैकी एक आहे रावण, रावण राक्षस असला […]

शिवलिंगावर करू नये 'या' गोष्टी अर्पण; जाणून घ्या कारण
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 2:47 PM

भगवान शंकर (Bhagwan shankar) यांना देवांचे देव म्हणून ओळखले जाते. भोळा शंकर, महादेव, शिव अशा वेगवेगळ्या नावाने भक्त त्यांना साद घालतात. महादेवाची भक्ती करून त्यांचा आशीर्वाद मिळावे प्रत्येकासाठीच शक्य आहे. त्यामुळेच तर हिंदू पुराणातील कथेनुसार, ते राक्षसांवर देखील प्रसन्न व्हायचे आणि त्यांनी अनेक राक्षसांना वरदान देखील दिले आहे. त्यांपैकी एक आहे रावण, रावण राक्षस असला तरी तो शिव भक्त होता. भगवान शिव आपल्यावर प्रसन्न व्हावेत, म्हणून मनुष्य देखील अनेक प्रयत्न करतात. तसेच ते सोमवारी भगवान शिवची विधिवत पूजा देखील करतात. भगवान शंकराच्या पूजेमध्येही शिवलिंगाचे (Shivling) विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की, शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात,  परंतु अशा ही काही गोष्टी आहेत, ज्या भोले शंकरांना अप्रिय  आहेत, त्यामुळे अशा गोष्टी शंकराला कधीही अर्पण करू नयेत (things should not offer). जाणून घेऊया भगवान शंकराला काय अर्पण करू नये.

  1. हळद हिंदू धर्मातील प्रत्येक पूजा किंवा विधीमध्ये हळदीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पण शिवलिंगावर हळद अर्पण करु नका. धार्मिक ग्रंथानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहे आणि हळदीचा वापर सौंदर्य उत्पादन म्हणून केला जातो. असे मानले जाते की, शिवलिंगाला हळद अर्पण केल्यास व्यक्तीचा चंद्र कमजोर होतो.
  2. कुमकुम किंवा सिंदूर हिंदू धर्मात कुमकुम आणि सिंदूर यांना विशेष महत्त्व आहे. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुमकुम किंवा सिंदूर लावतात. तसेच काही लोक शिवलिंगाला सिंदूरही अर्पण करतात, परंतु शिव पुराणात असे म्हटले आहे की, शिवलिंगाला चूकूनही कुंकु लावू नका.
  3. तुळशी हिंदू धर्मातील अनेक देवतांच्या पूजेदरम्यान तुळशीची पाने अर्पण केली जातात. मात्र शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण कधीही करु नका. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने तुळसीच्या पतीचा वध केला होता. तेव्हापासून त्यांना तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत.
  4. लाल आणि केतकीची फुले पूजेच्या वेळीही भोलेशंकरांना लाल रंगाची फुले अर्पण करू नयेत. एके काळी भोलेशंकरांनी केतकीच्या फुलांना शाप दिला की, ते कधीही भगवान शंकराला पूजेत लाल फुले अर्पण करणार नाहीत.
  5. हे सुद्धा वाचा
  6. नारळ पाणी नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे अभिषेक करताना शिवाला नारळपाणी अर्पण करू नये. यासोबतच शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू देखील आपण स्वत:सोबत आणू नये.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
'जेवढे जेवढे लोक भाजपमध्ये येतील...,' काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे
'जेवढे जेवढे लोक भाजपमध्ये येतील...,' काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे.
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका.
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर.
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?.
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले.
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस.
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट.
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच....
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच.....
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले.
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका.