Pandharpur Wari 2022: तुकोबांच्या पालखीचे यवत येथे आगमन; वारकऱ्यांनी घेतला पिठलं भाकरीचा आस्वाद

जगदगुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी (Tukaram maharaj palkhi) सोहळा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या गावी आल्यानंतर वारकऱ्यांना (Pandharpur Wari 2022) एक वेगळाच आस्वाद दिला जातो. गेल्या अनेक वर्षा पासून अखंडीत पणे वारकऱ्यांना पिठलं भाकरीचे भोजन दिले जाते. दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा यवत मधील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावतो. या ठिकाणी आल्यानंतर […]

Pandharpur Wari 2022: तुकोबांच्या पालखीचे यवत येथे आगमन; वारकऱ्यांनी घेतला पिठलं भाकरीचा आस्वाद
नितीश गाडगे

|

Jun 26, 2022 | 7:05 AM

जगदगुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी (Tukaram maharaj palkhi) सोहळा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या गावी आल्यानंतर वारकऱ्यांना (Pandharpur Wari 2022) एक वेगळाच आस्वाद दिला जातो. गेल्या अनेक वर्षा पासून अखंडीत पणे वारकऱ्यांना पिठलं भाकरीचे भोजन दिले जाते. दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा यवत मधील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावतो. या ठिकाणी आल्यानंतर गेल्या अनेक वर्षाच्या परंपरे नूसार वारकऱ्यांना पिठलं भाकरीचे भोजन दिले जाते. गोडधोड जेवणानंतर ग्रामीण भागातील ढंगातील चूलीवरील भाकरी व पिठलं जेवणाचा आस्वाद  लाखो वारकरी घेतात.
अनेक वर्षांपासून यवतमधील ग्रामस्थ श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामी चांगली व्यवस्था ठेवत आले आहेत. यातील एक वेगळा आणि वारकऱ्यांचा आवडता विषय म्हणजे येथील मुक्कामात वारकऱ्यांना मिळणारी मेजवानी. संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात राज्यातील प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असतो. देहू येथून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पालखी सोहळा पहिले काही मुक्काम शहरी परिसरात असल्याने तेथेही वारकऱ्यांना चांगली मेजवानी दिली जाते. मात्र यवत मुक्कामी ग्रामीण भागातील लोकांना आवडणारी चूलीवरील पिठले-भाकरीची मेजवानी असते. यामुळे वारीत कधी घरातल्याप्रमाणे जेवणाचा आनंद घेता येतोय, याची वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात. यवतमध्ये पिठलं-भाकरी तयार करण्याची देखील अनोखी प्रथा आहे. यवतच्या पिठलं-भाकरीची चव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें