वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला, 14 जणांचा जागीच मृत्यू

वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळल्याने तब्बल 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 45 लोक जखमी झाल्याचे समोर येत आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही घटना घडली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:42 PM, 23 Jun 2019

राजस्थान : वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळल्याने तब्बल 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 45 लोक जखमी झाल्याचे समोर येत आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेर जिल्ह्यातील जसोल गावातील एका शाळेतील मैदाना रामकथेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी मैदानात जवळपास 200 फूट उंच मंडप बांधण्यात आले होते. यात जवळपास 1 हजार पेक्षा अधिक श्रद्धाळू भाविक सहभागी झाले होते.

 

मात्र दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे रामकथेच्या कार्यक्रमासाठी लावलेले मंडप कोसळले. यामुळे नागरिकांची पळापळ सुरु झाली. तसेच मंडपात अनेक ठिकाणी वीजेची उपकरण लावली होती. मंडप कोसळल्याने त्या उपकरणातून विजेचा करंट सर्वत्र पसरला. त्यामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. डीएम हिमांशू गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंडपात वयस्कर व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

या घटनेनंतर स्थानिक लोकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सध्या जखमींवर उपचार सुरु असून, मृतांचा संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.