
ऑपरेशन सिंदूरनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. यापुढे पाकिस्तानशी चर्चा फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच होईल असं मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच न्युक्लिअर ब्लॅकमेलिंग चालणार नाही असंही यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान?
आम्ही दशतवाद्यांच्या इशाऱ्यावर चालणारी सरकार आणि दहशतवाद्यांच्या आकांना वेगळं पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने पाकिस्तानचा चेहरा पाहिला आहे. मारलेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी पाकिस्तानचे अधिकारी होते. स्टेट स्पॉन्सर्ड टेररीझमचा हा मोठा पुरावा आहे. भारत आणि आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने निर्णायक पावलं उचलत राहू. युद्धाच्या मैदानात आम्ही पाकिस्तानला प्रत्येकवेळी धूळ चारली आहे. यावेळी ऑपरेशन सिंदूरने नवीन आयाम जोडला आहे. आम्ही डोंगर आणि रेतीच्या प्रदेशात आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. आपली मेड इन शस्त्रही महत्त्वाची ठरल्याचं आपण पाहिलं आहे. प्रत्येक प्रकारच्या दहशतवादा विरोधात आपण सर्वांनी एकजूट राहणं, ही आपली एकता आपली सर्वात मोठी शक्ती ठरली आहे. हे युग युद्धाचं नाहीये. पण हे युग दहशतवाद्यांचं पण नाहीये, टेररिझमच्या विरोधात झिरो टॉलरन्स ही एक चांगल्या जगाची गॅरंटी आहे, असं मोदी यांनी यावेळी म्हटलं.
पाकिस्तानी फौज आणि पाकिस्तानचं सरकार ज्या पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालत आहे, तेच एक दिवस पाकिस्तानला संपवेल. पाकिस्तानला वाचायचं असेल तर टेरर इन्फ्रास्ट्रक्चरचा सफाया करावा लागेल. त्याशिवाय शांतीचा काहीही मार्ग नाही. भारताचं मत एकदम स्पष्ट आहे. टेरर आणि टॉक एकसाथ होणार नाही. टेरर आणि ट्रेड एकत्र होणार नाही, पाणी आणि खूनही एक साथ वाहू शकत नाही. मी आज विश्वालाही सांगेल की, पाकिस्तानशी चर्चा होईल तर ती फक्त टेररिझमवरच होईल. चर्चा होईल तर पीओकेवरच होईल, असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.