आकाशात मोठा थरार… भारतीय पायलटची जीवाची बाजी; मोदी म्हणाले, स्मितने 9/11 होण्यापासून वाचवलं!

भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांनी दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानात चाकूने जखमी असतानाही असीम शौर्य दाखवले. त्यांनी सह-पायलटला विमान क्रॅश करण्यापासून रोखत 100 हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवले. या अतुलनीय पराक्रमाबद्दल पंतप्रधान मोदी, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

आकाशात मोठा थरार... भारतीय पायलटची जीवाची बाजी; मोदी म्हणाले, स्मितने 9/11 होण्यापासून वाचवलं!
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 12:44 PM

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये झालेल्या घटनेवेळी शौर्य दाखवल्याबद्दल भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांचं जगभरात कौतुक होत आहे. स्मित यांनी आपल्या को-पायलटला विमान क्रॅश करण्यापासून रोखलं. चाकू लागून गंभीर जखमी झालेले असतानाही त्यांनी असाधारण शौर्य दाखवलं. त्याची दखल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेऊन स्मित मच्छार यांना सच्चा नायक म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्मित यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. कॅप्टन स्मित यांनी 9/11 होण्यापासून वाचवलं. त्यांच्या पराक्रमाने देशाचा गौरव वाढला आहे, असं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीएससीच्या एका कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच स्मित मच्छार यांचं तोंडभरून कौतुक केलं. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी एका भारतीयाने 9/11 होण्यापासून वाचवल्याचं म्हटलंय. स्मित यांचा हा पराक्रम गौरवास्पद आहे. त्याच्या शौर्यावर संपूर्ण जगाला अभिमान वाटत आहे. मी त्यांचे वडील भूपेंद्र भाई, आई गीता आणि पत्नी सोनल यांच्याशी चर्चा केली. आज संपूर्ण जगाला स्मितचा अभिमान वाटतोय. स्मित यांना लवकर बरे वाटावे म्हणून देशावासिय प्रार्थना करत आहेत. स्मितचं अभिनंदनही करत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Loading...

नेतन्याहू काय म्हणाले?

एका भारतीयाने 9/11 होण्यापासून वाचलं. तो सच्चा नायक आहे, असं इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलंय. आम्ही ब्रिटनला गुप्त माहिती दिली होती. हल्ला होणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच या हल्ल्याला इराणचा पाठिंबा होता, असंही कळवलं होतं, असा दावा नेतन्याहू यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना केला आहे.

नायडूंकडून कौतुक

केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री के. राम मोहन नायडू यांनी स्मित यांचं कौतुक केलं आहे. कॅप्टन स्मित यांच्या शौर्याचा आणि हिमतीचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा हल्ला झाल्यावर स्मित यांचा जीव धोक्यात गेला तेव्हा कठिण आणि नाजूक काळ होता. त्यावेळी त्यांनी 100 हून अधिक लोकांचा जीव वाचवला. भारताची हीच ओळख आहे. त्यांच्या शौर्याने भारताला अभिमान वाटत आहे, असं राम मनोह नायडू यांनी म्हटलं आहे.

मित्रांनी काय म्हटलं?

दरम्यान, स्मित यांच्या मित्रांनीही आपल्या मित्राच्या शौर्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय आणि स्मितचे शेजारी असल्यामुळे आम्हाला स्मितच्या शौर्याचा गौरव आहे. त्यांची प्रकृती लवकर ठिक व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करतोय. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे. आम्ही त्यांच्या प्रकृतीच्या ताज्या अपडेटची वाट पाहत आहोत, असं स्मितच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us