पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंध्रातील श्रीशैलमला भेट, माँ भ्रामरांबा आणि भगवान मल्लिकार्जुन यांचे घेतले दर्शन, पाहा Video

पंतप्रधान गुरुवारी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर होते. येथे त्यांनी श्रीशैलमच्या श्री भ्रामरांबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम मंदिराचे दर्शन घेतले आणि पूजा केली. मोदी यांच्या हस्ते आंध्रप्रदेशातील अनेक विकास योजनांचे भूमीपूजन आणि लोकार्पण होणार आहे. .त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्राचा दौरा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. येथे एका विशेष समारंभात मोदी यांच्या हस्ते अनेक योजनांचे भूमीपूजन आणि उद्घाटन होणार आहे. आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज मोदी यांचे येथे स्वागत केले. या दरम्यान पीएम मोदी यांनी नंद्याल जिल्ह्यातील श्रीशैलममध्ये स्थित श्री भ्रामराम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानमचे दर्शन घेतले आणि सांग्रसंगीत पूजा विधी केला.

सीएम नायडू यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहीले की,” आंध्र प्रदेशातील लोकांच्यावतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आमच्या राज्यात हार्दिक स्वागत करीत आहे.”

अनेक योजनांचे उद्घाटन

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कुरनूल येथे गेले, जेथे मोदी यांच्या हस्ते १३,४३० कोटी रुपयांच्या अनेक विकास योजनांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात येणार आहे. आणि त्यांनी या योजनांचे राष्ट्राला लोकार्पण होणार आहे.

या योजनांमध्ये उद्योग, रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस सह अनेक प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. यांचा उद्देश्य राज्यातील पायाभूत सुविधा वाढवणे, औद्योगिकरणाला तेजी आणणे आणि राज्यातील सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणे आहे.

स्फूर्ती केंद्राचाही केला दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्राचा देखील दौरा केला आहे. हा एक स्मारक परिसर असून यात ध्यान केंद्राचाही ( Meditational Hall ) समावेश आहे. या स्फूर्ती केंद्राच्या चारही बाजूला प्रसिद्ध किल्ल्याचे मॉडेल बनवले आहेत, त्यात प्रतापगड, राजगड, रायगड आणि शिवनेरी किल्ल्याचे मॉडेल तयार केले आहेत. या परिसराच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराज यांची ध्यानस्थ प्रतिमा स्थापित केली आहे. याची खास बाब म्हणजे याची स्थापना १६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्रीशैलम येथील भेटीनंतर स्मृती म्हणून करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या श्रीशैलम मंदिरात पूजा केली होती त्याला खास महत्व आहे. हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि ५२ शक्तीपाठांपैकी एक आहे. या मंदिराचे अनोखे वैशिष्ट्ये म्हणजे हे एकमेव मंदिर आहे ज्यात ज्योतिर्लिंग आणि एक शक्तीपीठ दोन्ही आहे. याच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे हे मंदीर संपूर्ण देशातील वेगळे मंदिर आहे.