पुरग्रस्त पंजाब आणि हिमाचल प्रदेशात पीएम मोदी यांचा दौरा, सध्या काय स्थिती ?

पंजाबला अतिवृष्टीनंतर पुराने घेरले असून अनेक लोकांना आपली घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणाचा आधार घ्यावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ९ सप्टेंबर रोजी पंजाब आणि हिमाचल प्रदेशाचा दौरा करणार असून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

पुरग्रस्त पंजाब आणि हिमाचल प्रदेशात पीएम मोदी यांचा दौरा, सध्या काय स्थिती ?
pm modi
| Updated on: Sep 08, 2025 | 9:08 PM

पंजाबमध्ये अतिवृष्टीने आलेल्या पुराने संपूर्ण राज्यात भयंकर नुकसान झाले आहे. भारतीय लष्कर सातत्याने मदत आणि पुनर्वसन कार्य करत आहेत. या नैसर्गिक संकटाने अनेकांचे बळी घेतले आहे आणि अनेकांना आपली घरेदारे सोडावी लागली आहेत. शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमिनीवर पिक नष्ट झाली आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ सप्टेंबर रोजी पंजाबच्या पुरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. पंजाबसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील पुर आणि भूस्खलनाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.

सैन्याचे मदत आणि पुनर्वसन कार्य सुरु

भारतीय लष्कर, एनडीआरएफ, बीएसएफ, पंजाब पोलीस आणि जिल्हा प्रशासन मदत आणि पुनर्वसन कार्यात गुंतले आहेत. भारतीय लष्कराने पुरमय भागात अनेक टीम पाठवल्या आहेत. लोकांना सखल भागातून सुरक्षित दुसऱ्या भागात हलवण्यासाठी स्थानिक लोक, मदत संघटना आणि प्रसिद्ध हस्तींनी देखील हातभार लावला आहे.

पंतप्रधानांचा दौरा असा असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ९ सप्टेंबर रोजी हिमाचल प्रदेश आणि पंजाबला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतील. ते आधी हिमाचल प्रदेशात हवाई पाहणी करतील. नंतर दुपारी १.३० वाजता हिमाचल प्रदेशातील कांग्रा येथे अधिकाऱ्यांची उच्च स्तरिय बैठक घेतील. त्यानंतर पीडीत लोकांशी बोलतील. बचाव पथकांशी देखील संवाद साधतील. दुपारी ३ वाजता पंजाब येथील पुरस्थितीचा आढावा पंतप्रधान घेतील. गुरुदास पुर येथे सायंकाली ४.१५ वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतील. नंतर पुरग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतील.पंतप्रधान दोन्ही राज्यातील मदत आणि पुनर्वसन कार्यावर स्वत:जातीने लक्ष ठेवणार आहेत.

५ मुद्यांद्वारे पंजाब पुरस्थिती जाणून घ्या

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनील जाखड यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पंजाबच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी येत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना शुक्रवारी थकवा आणि हार्ट रेट कमी झाल्याच्या तक्रारी नंतर रुग्णालयात दाखल केले आहे. ते ही मदत आणि पुनर्वसन कामावर नजर ठेवून आहेत.

अनेक दशकानंतर पंजाबात असा भयानक पूर आला आहे. सतलुज, ब्यास आणि रावी नद्यांना पुर आलेला आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीरमध्ये अतिवृष्टीने नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. रविवारी नद्यांची पातळी थोडी कमी झाली आहे. परंतू स्थिती अजूनही चिंताजनक आहे. आणखी दोघांचा मृत्यू झाल्यानंतर पंजाबात पुराने मृत्यू झालेल्यांची संख्या ४८ झाली आहे. पुराने १.७६ लाख हेक्टरमधील पिके खराब झाली आहेत. पंजाब स्कूल,कॉलेज, युनिव्हर्सिटी आता ८ सप्टेंबरपासून उघडल्या आहेत. शिक्षण मंत्री हरजोत बँस यांनी सांगितले की जर कुठल्या शाळा आणि कॉलेज पुराने नुकसान झाले असेल तर ते त्या विभागाचे डेप्युटी कमिश्नर स्थानिक पातळीवर निर्णय घेतील. खाजगी शाळा ८ सप्टेंबर पासून उघडतील. परंतू सरकारी शाळा ९ सप्टेंबर पासून उघडतील.

पोंग धरणाच्या जलपातळी दोन फूट घटून १,३९२.२० फूट झाली आहे. तरीही वरची सीमा १,३९० फूटावरुन दोन फूट जास्त आहे. शनिवारी पोंग धरणाची जलपातळी १,३९४.२० फूट होती. धरणातील पाण्याची पातळी ४७,१६२ क्युसेकने घटून ३६,९६८ क्युसेक झाली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार सुमारे ९०,००० क्युसेक पाणी शाह कॅनॉल बॅराजमध्ये सोडण्यात आले आहे. भाक्रा धरणाची पाणी पातळी रविवारी १,६७७.९८ फूट होती.तर शनिवारी यात १,६७८.१४ फूट पाणी होते. धरणातील पाण्यात ६६,८९१ क्युसेक पाण्याचा आवक झाली आणि ७०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला.