
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय थायलंड दौऱ्यावर गेले आहेत. ते थायलंडमध्ये दाखल झाले आहेत. थायलंडचते पंतप्रधान पैतोंगतार्न शिनावात्रा यांच्या निमंत्रणावरुन मोदी त्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत. पीएम मोदी 4 एप्रिल 2025 रोजी आयोजित होणाऱ्या 6 व्या बिम्सटेक शिखर सम्मेलनात सहभागी होतील. पंतप्रधान मोदींचा हा तिसरा थायलंड दौरा आहे. त्यानंतर पीएम मोदी श्रीलंकेसाठी रवाना होतील.
पीएम मोदी सर्वप्रथम थायलंड येथे BIMSTEC शिखर समेलनात सहभागी होतील. यात 7 देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत. सम्मेलनात थायलंड, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आणि भूतानचे नेते सहभागी होणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान 4 ते 6 एप्रिल दरम्यान श्रीलंकेच्या दौऱ्यावर जातील. भारताच्या आर्थिक मदतीने श्रीलंकेत होत असलेल्या विकास प्रकल्पांच पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
उद्देश काय?
6 व्या बिम्सटेक शिखर सम्मेलनाच्या घोषणापत्राचा स्वीकार करणं, हा शिखर सम्मेलनाचा उद्देश आहे. यात नेत्यांचा दृष्टीकोन आणि सूचना असतील. ऐतिहासिक बँकॉक व्हिजन 2030, भविष्यात सहकार्य वाढवण्यासाठी पहिला रणनितीक रोडमॅप असेल. बंगालच्या खाडीत व्यापार आणि यात्रा विस्तार सुद्धा यामध्ये आहे.
बिम्सटेकची शेवटची बैठक कधी झालेली?
रणनितीक आकार देण्याच्या दृष्टीने बिम्सटेकच्या या शिखर सम्मेलनाची मदत होणार आहे. बंगालच्या खाडीत आर्थिक विकास, सुरक्षा सहकार्य आणि सतत विकासासाठी हा मंच महत्त्वपूर्ण ताकद ठरेल. भारत बिम्सटेकच्या चार संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. 2018 साली नेपाळच्या काठमांडूमध्ये शेवटच बिम्सटेक शिखर सम्मेलन झालं होतं. हे चौथ सम्मेलन होतं. त्यानंतर बिम्सेटक नेत्यांची ही पहिली ऑफलाइन बैठक आहे. थायलंडमध्ये होणारं हे सहावं सम्मेलन आहे.