
आंतरराष्ट्रीय राजकारणात काही शिष्टाचार असतात. दोन वेगळ्या देशांचे नेते जेव्हा भेटतात किंवा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विविध देशांचे राष्ट्रप्रमुख एकत्र येतात, तेव्हा परस्परांना भेटण्याची एक पद्धत असते. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जेव्हा दोन देशांचे नेते भेटतात, तेव्हा ते हँडशेक म्हणजे परस्परांशी हस्तांदोलन करतात किंवा परस्परांच्या गालावर किस करतात. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून ज्या प्रमाणे भारतात अमूलाग्र बदल झालाय तसाच तो आंतरराष्ट्रीय राजकारणातही झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. वेगळी ओळख निर्माण केलीय. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आंतरराष्ट्रीय नेत्यांना भेटतात तेव्हा ते नुसतं हस्तांदोलन करत नाहीत, तर खुल्या मनाने गळाभेट घेतात. त्यामध्ये एक आपलेपणाची भावना असते. भारतात मित्र परिवार, नातेवाईक बऱ्याच दिवसांनी परस्परांना भेटतात, तेव्हा अशाच पद्धतीने गळाभेट घेतली जाते. कारण त्यात प्रेमाचा, मायेचा ओलावा असतो.
आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही झप्पी लोकप्रिय होतेय. कूटनितीची ही नवीन कोरियोग्राफी सर्वोच्च स्तरावर भारताची ओळख बनत चालली आहे. हात खुले करुन एखाद्याची गळाभेट ही कृती खूप सोपी आणि पावरफुल आहे. त्यातून मित्रत्वाचा, विश्वासाचा आणि आपलेपणाचा संदेश जातो. व्हाइट हाऊसच्या लॉनपासून ते युरोपच्या अंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही समकक्ष राष्ट्रप्रमुखाला अलिंगन देऊन भेटताना आतापर्यंत अनेकदा पाहिलं असेल.
गालावर किस करण्याची पद्धत
ब्रिटिशांची शिष्टाचाराची एक पद्धत आहे, ते समोरच्या नेत्याला किंवा व्यक्तीला भेटताना हँडशेक म्हणजे हस्तांदोलन करतात. अमेरिकन हँडशेक करताना हात जोरात दाबतात. युरोप खंडातील अनेक देशांमध्ये भेट घेताना गालावर किस करण्याची पद्धत आहे. यात जेंडर म्हणजे लिंग कुठलही असो. स्त्री-पुरुष परस्परांना भेटताना गालावर किस करतात. रशियामध्ये परस्परांना भेटल्यानंतर ओठांवर किस करण्याची पद्धत आहे. पाश्चात्य देशांमध्ये अशा गोष्टींमुळे कोणी असहज होत नाही. तो त्यांच्या परंपरेचा, संस्कृतीचा भाग आहे.
नमस्तेला जागतिक मान्यता मिळाली
वरती उल्लेख केलेल्या कृती, मानवी इशारे हे असेच नसतात, त्याला अर्थ असतो. त्याच्यामागे अनेक शतकांची संस्कृती, परंपरा आहे. भारतीय पंरपरेमध्ये नमस्तेला खूप महत्त्व आहे. कोविड-19 च्या काळात संसर्ग पसरण्याच्या भितामुळे याच नमस्तेला जागतिक मान्यता मिळाली होती. दुसरीकडे झप्पी ही अनौपचारिक, खूप व्यक्तीगत आपलेपणाची जाणीव करुन देणारी कृती आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झप्पीच्या कुटुनितीच आंतरराष्ट्रीय राजकारणात आज एक वेगळं स्थान निर्माण झालय.