धक्कादायकः पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी स्फोटकांचा मोठा साठा जप्त!

पोलिसांनी जप्त केलेल्या संशयास्पद साहित्यात 65 डिटोनेटर्स, 360 जिलेटिनच्या कांड्या, 13 कनेक्टिंग वायर्स आदींचा समावेश आहे. भांकरी रोड येथून हे साहित्य जप्त करण्यात आलं.

धक्कादायकः पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी स्फोटकांचा मोठा साठा जप्त!
Image Credit source: social media
| Updated on: Feb 10, 2023 | 2:32 PM

संदीप राजगोळकर, नवी दिल्लीः मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौरा आयोजित करण्यात आला आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्या राजस्थान (Rajasthan) दौऱ्यापूर्वी मोठी घडामोड समोर आली आहे. मोदींच्या राजस्थान दौऱ्यात स्फोट (Blast) घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा कट होता, अशी शंका व्यक्त केली जातेय. राजस्थानात 12 जानेवारी रोजी मोदी यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. तत्पुर्वी गुरुवारी 9 फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या दौसा येथून 1 हजार किलो स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर एका व्यक्तीला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

12 फेब्रवारी रोजी मोदी राजस्थानात

दौसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करतील.

पंतप्रधानांचा दौरा असल्याने स्थानिक जिल्हा प्रशासन आणि पोलीस अलर्ट मोडवर आहेत. गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांच्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आली.

किती स्फोटकं जप्त?

पोलिसांनी जप्त केलेल्या संशयास्पद साहित्यात 65 डिटोनेटर्स, 360 जिलेटिनच्या कांड्या, 13 कनेक्टिंग वायर्स आदींचा समावेश आहे. भांकरी रोड येथून हे साहित्य जप्त करण्यात आलं.

पोलिसांनी या प्रकरणी आरोप केलेल्या आरोपीचं नाव राजेश मीणा असं सांगण्यात येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी अतिरेकी हल्ल्याचा कट होता, असा संशय व्यक्त केला जातोय. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. लवकरच सविस्तर माहिती समोर येईल, असे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते हजेरी लावतील. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन मोदींच्या हस्ते आज होत आहे.

सीएसटी स्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेसमधील लहान मुलांशी गप्पा मारणार आहेत.

मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातील मरोळ परिसरात बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे.