PM Narendra Modi | स्वपक्षातल्या घराणेशाहीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय

| Updated on: Aug 17, 2023 | 11:39 AM

PM Narendra Modi | भाजपाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो मानस व्य़क्त केलाय, त्याचा देशभरातील भाजपा नेत्यांना मोठा फटका बसू शकतो. पंतप्रधान मोदी सातत्याने परिवारवाद विषयावरुन टीका करत असतात.

PM Narendra Modi | स्वपक्षातल्या घराणेशाहीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय
PM Narendra Modi
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा जाहीर भाषणातून परिवारवाद, घराणेशाहीवर टीका करत असतात. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाच नुकसान झालय, याकडे त्यांचा रोख असतो. याच मुद्यावरुन ते काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी आणि घराणेशाहीची परंपरा पुढे नेणाऱ्या राजकीय पक्षांवर टीका करत असतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वपक्षापासूनच घराणेशाहीला आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका भाजपामधीलच अनेक नेत्यांना बसू शकतो.

कारण भाजपामधील काही नेत्यांची मुलं आमदार-खासदार आहेत. एकाच कुटुंबात आमदार-खासदाराची पद आहेत. हीच परंपरा बदलण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इरादा आहे.

बैठकीत मोदी काय म्हणाले?

भाजपामधील घराणेशाहीला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: आळा घालणार असल्याची माहिती आहे. आगामाी लोकसभा निवडणुकीत भाजपा नेत्याच्या मुलांना उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती आहे. भाजपाकडून आता महिला आणि युवकांना उमेदवारी दिली जाऊ शकते. भाजपाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली. मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची तिकीट कापली जाऊ शकतात, अशी सुद्धा माहिती आहे.

बैठकीला कोण उपस्थित होतं?

बुधवारी भाजपा मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची एक बैठक झाली. यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजपा नेते या बैठकीला उपस्थित होते.

कुठल्या मंत्र्यांची तिकीट कापली जाणार?

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीला चाप लावण्याचा मानस बोलून दाखवला. नेत्यांच्या मुलांची तिकीट कापली जाऊ शकता. सर्वसामान्य युवक आणि महिलांना उमेदवारी दिली जाऊ शकते. मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या कामाचा दर्जा घसरलेला आहे, त्यांचं सुद्धा तिकीट कापलं जाईल. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारीसाठी नवीन रणनिती ठरवली जाईल.