AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM नरेंद्र मोदी यांचा 12 ऑक्टोबरला उत्तराखंड दौरा, विकास कामांचं करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या दौऱ्यात 4200 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान मोदी ज्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील त्यामध्ये PMGSY अंतर्गत ग्रामीण भागात बांधण्यात आलेले 76 ग्रामीण रस्ते आणि 25 पुलांचा समावेश आहे.

PM नरेंद्र मोदी यांचा 12 ऑक्टोबरला उत्तराखंड दौरा, विकास कामांचं करणार उद्घाटन
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 11, 2023 | 1:24 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबरला उत्तराखंडला भेट देणार आहेत. यादरम्यान, पंतप्रधान पिथौरागढमध्ये सुमारे 4200 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. गुरुवार, 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजता पीएम मोदी पिथौरागढमधील जोलिंगकॉंग येथे पोहोचतील, तेथे ते पार्वती कुंड येथे पूजा आणि दर्शन घेतील. पंतप्रधान या ठिकाणी पवित्र आदि-कैलासाचे आशीर्वादही घेणार आहेत. हा परिसर अध्यात्मिक महत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो.

यानंतर पीएम मोदी सकाळी 9.30 वाजता पिथौरागढच्या गुंजी गावात पोहोचतील, जिथे ते स्थानिक लोकांशी चर्चा करतील. कला आणि उत्पादनांच्या प्रदर्शनातही सहभागी होतील. ते लष्कर, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) यांच्याशीही संवाद साधतील.

जागेश्वर धाम येथे पूजा

दुपारी 12 वाजता पंतप्रधान पिथौरागढहून अल्मोडा जिल्ह्यातील जागेश्वरला पोहोचतील. येथे ते जागेश्वर धाम येथे पूजा व दर्शन घेतील. सुमारे 6200 फूट उंचीवर असलेल्या जागेश्वर धाममध्ये सुमारे 224 दगडी मंदिरे आहेत.

4200 कोटींची भेट

पंतप्रधान दुपारी अडीच वाजता पिथौरागढला पोहोचतील, जिथे ते ग्रामीण विकास, रस्ते, वीज, सिंचन, पिण्याचे पाणी यासारख्या क्षेत्रातील सुमारे 4200 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान मोदी ज्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील त्यामध्ये PMGSY अंतर्गत ग्रामीण भागात बांधण्यात आलेले 76 ग्रामीण रस्ते आणि 25 पुलांचा समावेश आहे.

या योजनांचे उद्घाटन

  • 9 जिल्ह्यांमध्ये बीडीओ कार्यालयांच्या 15 इमारती
  • सेंट्रल रोड फंडांतर्गत बांधण्यात आलेले तीन रस्ते, कौसानी बागेश्वर रोड, धारी-दौबा-गिर्छीना रोड आणि नागला-किच्छा रोड या तीन रस्त्यांची सुधारणा करण्याचे काम.
  • राष्ट्रीय महामार्गावरील अल्मोडा पेटशाल- पानुवानुला- दन्या (NH 309B) आणि टनकपूर-चाल्ठी (NH 125) या दोन रस्त्यांच्या सुधारणांचे काम.
  • पिण्याच्या पाण्याशी संबंधित तीन प्रकल्प, ज्यामध्ये 38 पंपिंग पिण्याच्या पाण्याच्या योजना, 419 गुरुत्वाकर्षणावर आधारित पाणीपुरवठा योजना आणि तीन कूपनलिका आधारित पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे.
  • पिथौरागढमधील थरकोट कृत्रिम तलाव
  • 132 केव्ही पिथोरागढ-लोहाघाट (चंपावत) पॉवर ट्रान्समिशन लाइन
  • उत्तराखंडमध्ये 39 पूल
  • डेहराडूनमधील उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (USDMA) इमारत

या योजनांची पायाभरणी

  • 21 हजार 398 पॉली हाऊस बांधण्याची योजना आहे, ज्यामुळे फुले व भाजीपाल्याचे उत्पादन वाढण्यास आणि त्यांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.
  • सफरचंद बागांसाठी योजना
  • NH रस्त्यांच्या सुधारणांसाठी पाच प्रकल्प
  • राज्यातील आपत्ती सज्जता आणि लवचिकतेसाठी अनेक पावले जसे की पूल बांधणे
  • डेहराडूनमधील राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राचे अपग्रेडेशन
  • बालिनाला, नैनिताल येथे भूस्खलन रोखण्यासाठी पावले उचलली
  • आग, आरोग्य आणि इतर वनसंबंधित पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा
  • राज्यभरातील 20 मॉडेल पदवी महाविद्यालयांमध्ये वसतिगृहे आणि संगणक प्रयोगशाळा विकसित करणे.
  • सोमेश्वर, अल्मोडा येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय
  • चंपावतमध्ये ५० खाटांचे हॉस्पिटल ब्लॉक
  • हल्द्वानी स्टेडियम, नैनिताल येथे अॅस्ट्रोटर्फ हॉकी ग्राउंड
  • रुद्रपूरमधील वेलोड्रोम स्टेडियम
  • जगेश्वर धाम (अल्मोरा), हात कालिका (पिथौरागढ) आणि नैना देवी (नैनिताल) मंदिरांसह इतर मंदिरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मानसखंड मंदिर माला मिशन योजना.

Follow Us
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!