AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रीय अध्यक्षांचाच बालेकिल्ला फोडला, प्रशांत किशोर यांचे भाजपला चेकमेट, नितीन नवीन अजूनही धक्क्यात, म्हणाले…

Prashant Kishor Nitin Nabin: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या हक्काचा मतदारसंघ खेचून आणला. राष्ट्रीय अध्यक्षांचाच बालेकिल्ला फोडल्याने भाजपला हा जबर धक्का मानल्या जात आहे. त्यावर आता नबीन यांची प्रतिक्रिया सुद्धा आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांचाच बालेकिल्ला सुरक्षित नसल्याचा मोठा संदेश देशभर पोहचला आहे.

राष्ट्रीय अध्यक्षांचाच बालेकिल्ला फोडला, प्रशांत किशोर यांचे भाजपला चेकमेट, नितीन नवीन अजूनही धक्क्यात, म्हणाले...
प्रशांत किशोर, नितीन नबीन
| Updated on: Aug 04, 2026 | 8:34 AM
Share

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचाच मतदारसंघ सुरक्षित नसल्याचा संदेश देशभर पोहचला. जन सुराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी धक्कातंत्राचा वापर केला. बिहारमधील बांकीपूर येथे 34.3 टक्के मतदान झाले. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा हा परंपरागत मतदारसंघ होता. त्याला किशोर यांनी सुरूंग लावला. त्यांनी विजय मिळवताच विरोधकांच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या. हा अनपेक्षित धक्का बसताच नितीन नबीन यांची पहिली प्रतिक्रिया धडकली आहे.

नितीन नबीन यांनी सोमवारी देशातील तीन पोटनिवडणुकीतील परिणाम स्वीकारले आहेत. बिहारमधील त्यांच्या कुटुंबियांचा परंपरागत मतदारसंघ बांकीपूर हातचा गेला. तर मध्य प्रदेशातील दांतीय मतदारसंघात हाराकिरी झाली. या दोन्ही ठिकाणी पक्ष आढावा घेईल असे नबीन म्हणाले. तर त्यांनी गुजरातच्या मतदारांचे धन्यवाद मानले. मांजलपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. त्यांनी एक्सवरून या घाडमोडींवर ट्विट केले. देशातील जनतेने तीन ठिकाणी जो कौल दिला तो आम्ही मान्य करतो, असे त्यांनी म्हटले आहे. मांजलपूर येथील कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

भाजपला अनपेक्षित धक्का

भाजपला तीन पैकी दोन ठिकाणी अनपेक्षित धक्का बसला. त्यात बिहारमधील बांकीपूर हा नितीन नबीन यांच्या कुटुंबियांचा परंपरागत मतदारसंघ होता. ती त्यांची हक्काची जागा होती. ही जागा ते सहज निवडून येतील असे भाकीत करण्यात येत होते. तर प्रशांत किशोर यांचा पराभव होणार असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत होता. पण झाले उलटेच. भाजपला या मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला.

“गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे मनःपूर्वक आभार, तर विजयासाठी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन असे नितीन नबीन म्हणाले. बांकीपूर आणि दांतिया मतदारसंघामध्ये आम्हाला अपेक्षित जनादेश मिळाला नाही. दोन्ही ठिकाणच्या निकालांचे अत्यंत गांभीर्याने आम्ही आत्मपरीक्षण करू. नव्या ऊर्जेने आणि दृढ संकल्पाने पुन्हा जनतेमध्ये जाऊ. त्यांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहू” असे ट्वीट नितीन नबीन यांनी केले.

1995 पासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. सलग इतक्या वर्षांपासून येथील जनतेने भाजपवर विश्वास दाखवला आहे. स्वतः नितीन नबीन यांनी सलग चारवेळा या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले आहे. हा पक्षाचा सर्वाधिक सुरक्षित मानला जात असलेला शहरी मतदारसंघ आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर नितीन नबीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली.

Follow Us
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते... निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे न
Sunetra Pawar | निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे निर्देश; 26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते...
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानं
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानंतर...
ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! रायगडमध्ये ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत तब्बल 2000...
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी...
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी ...
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...
मोठा दिलासा! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश