President Election 2022 : द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल, सामान्य आदिवासी महिला, झारखंडच्या राज्यपाल ते देशाच्या भावी राष्ट्रपती, वाचा सविस्तर…

द्रौपदी मुर्मू या झारखंड राज्याच्या माजी राज्यपाल आहेत. आता त्यांना भाजपने राष्ट्रपतीपदी बसवण्याचा मानस बनवला आहे.

President Election 2022  : द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल, सामान्य आदिवासी महिला, झारखंडच्या राज्यपाल ते देशाच्या भावी राष्ट्रपती, वाचा सविस्तर...
| Updated on: Jun 24, 2022 | 1:19 PM

मुंबई : देशातील सर्वोच्च संविधानिक पदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी सत्ताधारी एनडीए आणि यूपीए तयारीत आहेत. दोन्ही बाजूने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काही वेळापूर्वी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजपने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे. आज त्यांनी संसदभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काही वेळापूर्वी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

कोण-कोण उपस्थित

यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते.

द्रौपदी मुर्मू कोण आहेत?

द्रौपदी मुर्मू या झारखंड राज्याच्या माजी राज्यपाल आहेत. आता त्यांना भाजपने राष्ट्रपतीपदी बसवण्याचा मानस बनवला आहे.

सामान्य आदिवासी महिला ते देशाच्या राष्ट्रपती व्हाया झारखंडच्या राज्यपाल

भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या कोण आहेत? त्यांची पार्श्वभूमी काय असा प्रश्न अनेकांना पडला. तर द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. सामान्य आदिवासी महिला ते राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचा जन्म 20 जून 1958 ला ओडिसामधल्या मयूरभंज जिल्ह्यात झाला.कुटुंबातील आर्थिक चणचणीमुळे लहानपणी त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्या उर्जा खात्यात कनिष्ठ अधिकारी म्हणून सहभागी झाल्या. पुढे त्यांना झारखंडच्या राज्यपालपदी बसण्याची संधी मिळाली. अन् आता भाजपने त्यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे.