राष्ट्रपती रामनाथ कोविंद रुग्णालयात, छातीत दुखू लागल्याने भरती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या छातीत दुखू लागल्याच्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Ram Nath Kovind Hospitalize)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रुग्णालयात, छातीत दुखू लागल्याने भरती
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
| Updated on: Mar 26, 2021 | 2:16 PM

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या छातीत दुखू लागल्याच्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोललं जात आहे. ANI या वृत्तसंस्थेने याबाबची माहिती दिली. (President Ram Nath Kovind Hospitalize)

राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर 

ANI ने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी रामनाथ कोविंद यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यामुळे त्यांना आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या राष्ट्रपतींचे रुटीन चेकअप केले जात आहे. राष्ट्रपतींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली आहे.

सध्या डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळत आहे. लवकर याबाबतची आणखी माहिती देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

प्रकृती अस्वस्थ्यामुळे दौरा रद्द

रामनाथ कोविंद यांचा हरिद्वारमध्ये दोन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला होता. आज ते या दौऱ्यासाठी रवाना होणार होते. यावेळी ते एका पदवीदान सभारंभात सहभागी होणार होते. मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. (President Ram Nath Kovind Hospitalize)

3 मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस 

दरम्यान राष्ट्रपती कोविंद यांनी 3 मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. आर्मी रिसर्च आणि रिफरल हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. राष्ट्रपती कोविंद यांनी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात परवानगी असलेल्या सर्वांनी कोरोना लस टोचून घेण्याचं आवाहन केलं होतं.

राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती कोविंद यांनी इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीमेला यशस्वीपूर्वक पूर्ण करत असलेले सर्व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकांचे आभार व्यक्त केले आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी ज्यावेळी कोरोना लस घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्याही उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे.