यंदाच्या दिवाळीपूर्वी देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना देशातील जनतेला दिवाळीपूर्वीच एक मोठी भेट दिली. यंदाच्या दिवाळीला जीएसटीमध्ये मोठा बदल केला जाईल.

यंदाच्या दिवाळीपूर्वी देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
| Updated on: Aug 15, 2025 | 9:41 AM

आज भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन आहे. या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर बाराव्यांदा तिरंगा फडकवला. यावेळी त्यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वीच देशवासियांना मोठी गुडन्यूज दिली आहे.

दिवाळीपूर्वी देणार गिफ्ट

“मी यंदा तुमच्या सर्वांची दिवाळी डबल दिवाळी करण्याचे काम करणार आहे. यंदाच्या दिवाळीला सर्वात मोठे गिफ्ट मी देशातील जनतेला देणार आहे. गेल्या ८ वर्षात आपण जीएसटीमध्ये मोठ्या सुधारणा केल्या आहेत. पूर्ण देशभरातील करांमध्ये कपात केली. करांमध्ये सुधारणा केली. आता ८ वर्षांनी काळाची गरज आहे की आम्ही हे रिव्ह्यूव करावे. यानंतर आम्ही एका उच्चस्तरीय समिती स्थापित केली. त्यांच्यासोबत या मुद्द्यांवर चर्चा केली. राज्य सरकारसोबतही चर्चा केली आणि आता आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणत आहोत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.

कर कमी होणार

“हे नवीन जीएसटी रिफॉर्म्स यंदाच्या दिवाळीपूर्वी ही तुमच्यासाठी एक भेट असणार आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांसाठीचे कर मोठ्या प्रमाणात कमी होतील. यामुळे जीएसटीचे दर कमी होतील. याचा सर्वाधिक उपयोग लघू उद्योग, मध्यम उद्योगांना होईल”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.

अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची शक्यता

दरम्यान नरेंद्र मोदींनी दिवाळीपूर्वीच केलेल्या या घोषणेमुळे देशवासियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जीएसटीमध्ये बदल केल्यानंतर रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती कमी होणार का, वस्तूंच्या स्वस्त होणार का, महागाईपासून दिलासा मिळणार का, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलं आहे. मात्र या घोषणेनंतर अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची शक्यता आहे.