AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी माणूस आहे, देव नाही, चुका माझ्याकडूनही होतात”; नरेंद्र मोदी यांची पहिल्याच पॉडकास्टमध्ये ‘मन की बात’!

निखिल कामतने त्यांना जर एखाद्या तरुणाला राजकारणात यायचं असेल तर त्याच्यात असे काय गुण असायला हवेत, असं तुम्हाला वाटतं, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.

मी माणूस आहे, देव नाही, चुका माझ्याकडूनही होतात; नरेंद्र मोदी यांची पहिल्याच पॉडकास्टमध्ये 'मन की बात'!
pm narendra modi podcast
| Updated on: Jan 10, 2025 | 3:24 PM
Share

PM Narendra Modi Podcast : झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत घेतली. ही मुलाखत पॉडकास्ट स्वरुपाची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही मुलाखत पॉडकास्ट स्वरुपातील पहिलीच मुलाखत आहे. आता नुकतंच या मुलाखतीचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भाष्य करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी मी माणूस आहे, देव नाही, चुका माझ्याकडूनही होतात, असे विधान केले.

निखिल कामत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्रेलर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी People with The Prime Minister Shri Narendra Modi असे म्हटले आहे. या व्हिडीओत निखिल कामत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न विचारत आहेत. त्यावर मोदीही त्यांना फारच मोकळेपणाने उत्तर देताना दिसत आहेत. यावेळी निखिल कामतने त्यांना जर एखाद्या तरुणाला राजकारणात यायचं असेल तर त्याच्यात असे काय गुण असायला हवेत, असं तुम्हाला वाटतं, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.

“चुका सर्वांकडून होतात”

“राजकारणात कायमच चांगल्या लोकांनी यायला हवं. राजकीय क्षेत्रात येताना महत्त्वाकांक्षा घेऊन येण्यापेक्षा एखादे ध्येय घेऊन यावे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो होतो, तेव्हा मी एक भाषण केले होते. त्यावेळी मी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या म्हटले होते की, चुका या सर्वांकडून होतात. माझ्याकडूनही चुका होतात. मी माणूस आहे, देव नाही”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“मी शांततेच्या बाजूने”

यानंतर नरेंद्र मोदी यांना निखिल कामत यांनी जगभरात सुरु असलेल्या युद्धांबद्दल विचारणा केली. “सध्या जगभरात काही ठिकाणी युद्ध सुरु आहेत, मग या युद्धाची चिंता आम्ही करावी का?”, असा प्रश्न निखिल कामत यांनी विचारला. त्यावर ते म्हणाले “जगभरात जे युद्ध सुरु आहेत त्यात मी तटस्थ नसल्याचे सातत्याने म्हटले आहे. मी शांततेच्या बाजूने आहे, असं सतत सांगितले आहे”, असेही मोदींनी म्हटले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार