
Raihan Vadra Engagement: क्राँग्रेस नेत्या प्रियंका गांझी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान याचा साखरपुडा झालेला आहे. असं सांगितलं जात आहे की, रेहान याचा साखरपुडा गर्लफ्रेंड अवीवा हिच्यासोबत झाला आहे. पण कुटुंबियांकडून याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही… याच कारणामुळे सर्वत्र प्रियंका गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांची चर्चा सुरु झाली आहे. लोकांना जाणून घ्यायचे आहे की रेहान कोण आहे आणि तो काय करते. तर आज जाणून घेऊ रेहान काय करतो…
प्रियांका गांधी यांचा मुलगा रेहान वाड्रा 25 वर्षांचा आहे. रेहान सहसा बऱ्याच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नाही, पण तो राहुल गांधींसोबत काही वेळा दिसला आहे. काही वर्षांपूर्वी रेहान याला राहुल गांधी यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं होतं… तेव्हा रेहान देखील राजकारणात प्रवेश करेल… अशी चर्चा रंगली होती… पण असं काहीही झालं नाही.
रेहान वाड्रा एक इन्स्टॉलेशन आणि व्हिज्युअल आर्टिस्ट आहेत. त्याने अनेक प्रदर्शने भरवली आहेत. डार्क पर्सेप्शन” या नावाने त्याने पहिलं प्रदर्शन भरवलं होतं.. एवढंच नाही तर रेहानला लहानपणापासूनच वन्यजीव फोटोग्राफीची आवड आहे आणि तो कमर्शियल फोटोग्राफी देखील करतो.
रेहान वाड्रा याने देहरादूनमधील प्रसिद्ध दून स्कूलमध्ये शिक्षण घेतलं, जिथे राजीव गांधी आणि राहुल गांधी यांनीही शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले. रेहान वाड्रा याने लंडनमधील एसओएएस विद्यापीठातून त्याचं उच्च शिक्षण पूर्ण केले.
अवीवा बेग ही एक फोटोग्राफर आहे आणि तिने देखील अनेक कला प्रदर्शने भरवली आहेत. दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर तिने पत्रकारितेची पदवी मिळवली, जरी नंतर तिला फोटोग्राफी आणि कला यात रस निर्माण झाला. अवीवा आणि रेहान अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि ते चांगले मित्र आहेत.