दारु दुकाने हटवण्यासाठी अनोखे आंदोलन, सुंदरकांड वाचन अन् बरेच काही

| Updated on: Apr 05, 2023 | 1:27 PM

दारुची दुकाने हटवण्यासाठी महिलांची अनेक आंदोलने आपण पाहिली आहेत. परंतु या ठिकाणी महिला आणि पुरुष एकत्र आले आहे. त्यांनी दारु दुकानांसमोर आंदोलन सुरु केले. कुठे दुधाचे पाकिटांचे वाटप केली. काही ठिकाणी गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी केली.

दारु दुकाने हटवण्यासाठी अनोखे आंदोलन, सुंदरकांड वाचन अन् बरेच काही
Follow us on

भोपाळ : दारुच्या दुकानांसमोर अनोखे आंदोलन सुरु आहे. सुंदरकांडचे वाचन केले जात आहे. हनुमान चालीसा होतेय. कुठे दुधाच्या पाकिटांचे वाटप केले जात आहे. काही जण गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी करत आहे. हे आंदोलन दारुची दुकाने हटवण्यासाठी आहे. ही दुकाने शाळा आणि हॉस्पिटलच्या जवळ आहेत. मागील चार दिवसांपासून हे आंदोलन करण्यात आले आहे. परंतु सरकार आणि प्रशासन अजूनही दखल घेत नाही. यामुळे नागरिक नाराज आहेत. माजी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आंदोलन केले होते.

कुठे सुरु आहे प्रकार


मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात हे अनोखे आंदोलन सुरु आहे. भोपाळमध्ये, रुग्णालये आणि शाळांजवळ दारूची दुकाने उघडण्याच्या विरोधात लोक रस्त्यावर आले आहेत. त्यांनी त्या दारूंच्या दुकानासमोर बसून सुंदरकांडाचे पठण केले. तसेच दुधाच्या पाकिटांचे वाटप केले. दुकानातील कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प दिले.

हे सुद्धा वाचा

शाळांजवळ मद्यापींची गर्दी


शाळा आणि हॉस्पिटल परिसरात दुकाने सुरु आहे. यामुळे या ठिकाणी मद्यपींची गर्दी होत असते. मद्यपी रस्त्यावरच दारूच्या नशेत फिरताना दिसतात. भोपाळमध्ये पुराण किला, स्टेट बँक, शाहजहानाबाद क्रमांक-१, बस स्टँड हमीदिया रोड, करोंड चौराहा यासह ५ दुकानांची जागा बदलण्याची मागणी केली जात आहे. सध्या हमीदिया रोड आणि पुराण किला येथील दुकानेच स्थलांतरित करण्यात आली आहेत.

उमा भारती यांनी केला होता विरोध

मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharati) यांनी दारूच्या दुकानांविरोधा मागे आंदोलन केले होते. भोपाळच्या बीएचईएव परिसरातील आझाद नगर येथील दारूच्या दुकानात घुसून उमा भारती यांनी दगडफेक केली होती. त्या दारूच्या दुकानात दगड फेकतानाचा व्हिडीओ मोबाईलवरुन चित्रित करण्यात आला. हा व्हिडीओ उमा भारती यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरुन शेअर केला होता.

मध्य प्रदेशात नवे धोरण काय

  • दारुच्या दुकानात बसून दारु पिण्यास बंदी
  • शिक्षण संस्था आणि धार्मिक स्थळांच्या 100 मीटर परिसरात दारु दुकानास परवानगी नाही
  • राज्यात दारु प्राशन करुन गाडी चालवल्यास शिक्षा अधिक कठोर