नुपुर शर्माच्या विरोधात देशभरात मुस्लिमांची निदर्शने, हजारो मु्स्लिमांची उपस्थिती, प्रयागराज-दिल्लीत हिंसाचार, वाचा कोणत्या राज्यात काय?

| Updated on: Jun 10, 2022 | 5:03 PM

पैंगबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या बडतर्फ प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरात तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील सलापूर, औरंगाबाद या शहरांसह, दिल्ली, उत्तर पर्दशे, कर्नाटक, बंगाल यासह अनेक राज्यांत जुम्म्याच्या नमाजानंतर हजारो मुस्लीम रस्त्यांवर आले आहेत.

नुपुर शर्माच्या विरोधात देशभरात मुस्लिमांची निदर्शने, हजारो मु्स्लिमांची उपस्थिती, प्रयागराज-दिल्लीत हिंसाचार, वाचा कोणत्या राज्यात काय?
Muslim protest in India
Image Credit source: TV 9 marathi
Follow us on

नवी दिल्ली – पैंगबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या बडतर्फ प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरात तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील सलापूर, औरंगाबाद या शहरांसह, दिल्ली, उत्तर पर्दशे, कर्नाटक, बंगाल यासह अनेक राज्यांत जुम्म्याच्या नमाजानंतर हजारो मुस्लीम रस्त्यांवर आले आहेत. यावेळी नुपुर शर्मा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे. काही ठिकाणी या आंदोलनात हिंसाचार झाल्याचाही घटना आहेत. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. प्रयागराजमध्ये आंदोलनकर्त्यांनी ट्रक जाळला आहे. तर कर्नाटकात नुपूर शर्मा यांचा पुतळा जाळण्यात आला आहे.

देशभरात कुठे कुठे होतायेत निदर्शने

१, उत्तर प्रदेश – नुपूरची जीभ छाटणाऱ्याला १ कोटींचे इनाम

उ. प्रदेशातील प्रयागराज, सहारनपूर, बाराबंकी. मुरादाबाद, उन्नाव, देवबंद यासह अनेक शहरांत जुम्म्याच्या नमाजानंतर तीव्र निदर्शने करम्यात आली आहेत. सहारनपूर आणि प्रयागराजमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिासंना लाठीमार करावा लागला आहे. भीम आर्मीचे प्रमुख सतपाल तंवर यांनी नुपूर शर्मा यांची जीभ छाटणाऱ्याला एक कोटींचे इनाम देण्याची घोषणा केली आहे.

२. दिल्ली – आंदोलनकर्त्यांना ओळखत नाही, शाही इमाम यांचे वक्तव्य

दिल्लीतल जामा मशिदीत जुम्म्याच्या नमाजासाठी १५०० हून अधिक जण जमा झाले होते. नमाजानंतर ३०० जण बाहरे आले आणि त्यांनी नुपुर शर्माविरोधात घोषणाबाजी केली. याबाबतची निदर्शने करण्याची योजना नव्हती असे शाही इमाम यांनी सांगितले आहे. नमाज संपल्यानंतर बाहेर आलेल्यांनी उत्सफुर्तपणे निदर्शने केली असे सांगण्यात आले आहे. ही माणसे कोण आहेत, हे माहित नसल्याचे शाही इमाम यांनी सांगितले. हे सगळे एमआयएमचे सदस्य असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

३. कर्नाटक – बेळगावात नुपूर शर्माचा पुतळा लटकवला

कर्नाटकात बेळगावात शुक्रवारी फोर्ट रोडवर एका मशिदीजवळ विजेच्या तारेवर भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांचा पुतळा लटकवण्यात आला आहे. या पुतळ्याबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर हा पुतळा तिथून हटवण्यात आला.

४. काश्मीर – श्रीनंगरसह अनेक ठिकाणी निदर्शने

काश्मिरात श्रीनगरसह इतरही अनेक शहरांत नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी घोषणाबाजीही झाला. नमाजानंतर ही निदर्शने करण्यात आली. अनेक पोस्टर्सही दाखवण्यात आले, त्यात मैंगबर मोहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांचे शिर कलम करण्याचा संदेश होता.

५. बंगाल-कोलकात्यात निदर्शने पण शांततेत

कोलकता आणि हावड्यात आंदोलनकर्त्यांनी रस्त्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. पैगंबराबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याचे वाईट हाल करु अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. गर्दीने दुकाने बंद करण्यासाठी गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला आणि जमावाला पांगवले.

६. झारखंड -रांचीत पोलिसांवर दगडफेक, गोळीबाराच्याही घटना

रांचीत नमाजानंतर आंदोलनकर्ते मुख्य रस्त्यावर आले. त्यानंतर हिंसाचार आणि दगडफेक करण्यात आली. पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. मुख्य रस्त्यावरील दुकाने बंद करण्यात आली. अनेक भागात मुस्लिमांनी तीव्र आंदोलने केली.

७. तेलंगणा – हैदराबादेत मक्का मशिदीबाहेर निदर्शने

तेलंगणात नमाजानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले. मक्का मशिदीच्या बाहेर नपुर शर्मा यांच्याविरोधात विरोध दर्शवण्यात आला. पोलिसांनी बळाचा वापर करुन जमावाला पांगवले. सध्या पोलीस आणि सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.