दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेनंतर 100 पेक्षा अधिक शेतकरी बेपत्ता

| Updated on: Feb 01, 2021 | 10:43 PM

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनाचं हिंसेत रुपांतर झाल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या हिंसेनंतर पंजाबचे जवळपास 100 पेक्षा जास्त शेतकरी बेपत्ता आहेत. (100 protester farmers missing in 26 January violence)

दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेनंतर 100 पेक्षा अधिक शेतकरी बेपत्ता
Follow us on

चंदिगड : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनाचं हिंसेत रुपांतर झाल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या हिंसेनंतर पंजाबचे जवळपास 100 पेक्षा जास्त शेतकरी बेपत्ता आहेत. या शेतकऱ्यांचा तपास लागावा यासाठी पंजाबचे मंत्री सुखजिंदर रंधावा आणि खासदार मनिष तिवारी यांच्या नेतृत्वातील मंत्र्यांनी सोमवारी (1 फेब्रुवारी) गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत भेट घेतली. याबाबत मनिष तिवारी यांनी ट्विटरवर माहिती दिली (100 protester farmers missing in 26 January violence).

“शेतकरी आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसेत अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची यादी सार्वजनिक करावी, अशी विनंती आम्ही गृहमंत्र्यांना केली आहे. जेणेकरुन त्यांना कायदेशीर मदत दिली जाईल. दिल्ली पोलिसांनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती द्यावी”, असं मनिष तिवारी यांनी सांगितलं (100 protester farmers missing in 26 January violence).

अटकेत असलेल्या शेतकऱ्यांच्या सूटकेसाठी वकिलांची फौज

“दिल्लीत झालेल्या हिंसेदरम्यान अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी पंजाब सरकारने 40 वकिलांची फौज तयार केली आहे. हे वकील अटकेत असलेल्या शेतकऱ्यांची बाजू मांडतील. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटतील. वकिलांची ही टीम शेतकऱ्यांसाठी मोफत लढेल”, असं रंधावा यांनी सांगितलं.

दिल्ली पोलिसांकडून 80 पेक्षा जास्त जणांना अटक

प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या हिंसेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 35 पेक्षा जास्त केस दाखल केले आहेत. याप्रकरणी 80 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

अमित शाह यांनी अटक केलेल्या आंदोलकांची नावे वेबसाईटवर टाकल्याची माहिती दिली आहे. याशिवाय केंद्र सरकारने आणखी काही बेपत्ता लोकांची नावे जाहीर केली असतील तर केंद्र सरकार अशा शेतकऱ्यांचादेखील शोध घेईल, असं अमित शाह यांनी सांगितल्याची माहिती रंधावा यांनी दिली.

हेही वाचा : त्यांच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, राजू पाटील यांची प्रतिक्रिया