पंजाबच्या आमदारांना एकच पेन्शन मिळणार, कोट्यवधी रुपये जनतेवर खर्च करणार, Bhagwant Mann यांचा मास्टरस्ट्रोक

| Updated on: Mar 25, 2022 | 4:35 PM

पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षानं (AAP) सत्ता स्थापन केल्यानंतर धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आणखी मोठा निर्णय घेतलाय.

पंजाबच्या आमदारांना एकच पेन्शन मिळणार, कोट्यवधी रुपये जनतेवर खर्च करणार, Bhagwant Mann यांचा मास्टरस्ट्रोक
भगवंत मान
Image Credit source: Twitter
Follow us on

चंदीगढ : पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षानं (AAP) सत्ता स्थापन केल्यानंतर धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आणखी मोठा निर्णय घेतलाय. भगंवत मान यांनी राज्यातील आमदारांना मिळणाऱ्या पेन्शन (MLA Pension) संदर्भात निर्णय घेतलाय. पंजाबच्या आमदारांना आता एका वेळेची पेन्शन मिळणार आहे. आमदार कितीही टर्म निवडून आले असली तरी त्यांना केवळ एका टर्मची पेन्शन मिळणार आहे. भगवंत मान यांच्या निर्णयामुळं पंजाब सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत.वाचणारा निधी पंजाबच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी वापरणार असल्याचं भगवंत मान म्हणाले. भगवंत मान यांच्या या निर्णयाचं आपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आहे. आपकडून पंजाबची सत्ता मिळाल्यानंतर धडाकेबाज निर्णयांची मालिका पंजाबच्या आपच्या सरकारकडून सुरु आहे.

भगवंत मान यांचं ट्विट

पंजाब सरकारनं का निर्णय घेतला?

भगवंत मान म्हणाले की आमदार लोकांना हात जोडून मत मागतात. अनेक जण तीन ते चार वेळा आमदार होतात. सहा वेळा आमदार होतात. काही कारणामुळं ते पराभूत होतात. मात्र, अनेक टर्म निवडून आल्यानंतर त्यांना लाखो रुपयांची पेन्शन मिळते. काही आमदारांना 5 लाख, 4 लाख रुपये दरमहा पेन्शन मिळते. तर, काही जण आमदार झाल्यानंतर खासदार देखील होतात. ते दोन्ही पेन्शन घेतात. त्यामुळं पंजाब सरकारनं आमदारांच्या पेन्शनसंदर्भात निर्णय घेतला आहे, असं भगवंत मान म्हणाले.

भगवंत मान यांनी बेरोजगारीचा मोठा मुद्दा असल्याचं देखील म्हटलं. विद्यार्थी पदवी घेऊन घरी बसले आहेत. ज्यांनी नोकरी मागितली त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. पाणी फेकण्यात आलं. विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. यामुळं आम्ही या समस्या सोडवण्यासाठी मोठी पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले.

अनेकदा निवडून आले तरी एकाच टर्मची पेन्शन

भगवंत मान यांनी एखादा व्यक्ती किती वेळाही निवडून आला तरी त्याला फक्त एकाच टर्मची पेन्शन मिळेल. यामुळं पंजाब सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. हे पैसे लोक कल्याणासाठी राबवली जाणार आहे. आमदारांच्या फॅमिली पेन्शनमध्येही कपात करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

Uttar Pradesh : योगींच्या शपथविधीला काही तास शिल्लक, लखनऊमध्ये एनकाऊंटरची घटना

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी, नव्या चेहऱ्यांना संधी? 7-8 महिला मंत्र्यांचाही समावेश?