पुतीन यांच्या भारत दौऱ्यामुळे अमेरिकेत मोठा भूकंप, ट्रम्प यांची जगात खळबळ उडून देणारी घोषणा, भारताबाबत मोठा निर्णय

रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी भारताला भेट देताच अमेरिकेमध्ये मोठा भूकंप आल्याचं पहायला मिळत आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक मोठा निर्णय घेतला असून, त्यांच्या नव्या घोषणेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

पुतीन यांच्या भारत दौऱ्यामुळे अमेरिकेत मोठा भूकंप, ट्रम्प यांची जगात खळबळ उडून देणारी घोषणा, भारताबाबत  मोठा निर्णय
डोनाल्ड ट्रम्प
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 06, 2025 | 1:36 AM

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये पुतिन यांनी मोठी घोषणा केली आहे. भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान पुतिन यांच्या या भारत दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वाचे करार देखील झाले आहेत, ज्यामुळे आता रशिया आणि भारत यांच्यातील जवळीक आणखी वाढण्याची शक्यता आहे. परंतु दुसरीकडे आता पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे अमेरिकेत मोठा भूकंप आल्याचं पहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनं आपली नवी नॅशनल सिक्योरिटी स्टॅटजी (NSS) जारी केली आहे.

या नव्या धोरणामध्ये अमेरिकेनं चीन आपला नंबर वनचा शत्रू असल्याचं म्हटलं आहे. तर भारत हा आपला महत्त्वाचा भागीदार देश असल्याचं म्हटलं आहे. तर रशियासंदर्भात देखील अमेरिकेनं नरमाईचं धोरण ठेवल्याचं पहायला मिळत आहे. अमेरिकेकडून 33 पानांचा एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये अमेरिकेनं आता आपलं नवं परराष्ट्र धोरण कसं असणार याबाबत स्पष्ट सांगितलं आहे. हे धोरण अमेरिकेचे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष त्यांच्या कार्यकाळात फक्त एकदाच जाहीर करू शकतात. त्यातून अमेरिकेची पुढची दिशा कशी असेल हे स्पष्ट होतं, आता अमेरिकेच्या या नव्या धोरणामुळे भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अमेरिकेची मोठी खेळी

अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढली आहे. त्यानंतर आता अमेरिकेनं हा निर्णय घेतला आहे, अमेरिकनं आपल्या नव्या धोरणामध्ये चीनला आपला नंबर एकचा शत्रू असल्याचं म्हटलं आहे, तर भारताला आपला महत्त्वाचा भागीदार देश असल्याचं म्हटलं आहे. याचा अर्थ आता स्पष्ट होतो की, चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताकडून मदतीची अपेक्षा आहे.

 

Follow Us