
बिहार विधानसभा निवडणूकीत विरोधी महागठबंधनला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसच्या सर्वात दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसला केवळ पाच जागा जिंकत्या आल्या आहेत आणि 8.71 टक्के मतदान मिळाले आहे. काँग्रेसच्या या पराभवामागे बिहारच्या बेगुसराय येथील एका गावकऱ्याने अजब तर्कट मांडले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान मेलेले मासे पकडले होते. त्यामुळे त्यांच्या पार्टीला मते मिळाली नाहीत. राहुल गांधी यांनी बेगुसराय येथे प्रचारादरम्यान स्थानिक मच्छीमारांसोबत तलावात उतरुन मासे पकडले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे.
बेगुसराय येथे काँग्रेस उमेदवार अमिता भूषण यांच्या समर्थनासाठी आयोजित निवडणूक सभेत राहुल गांधी आणि विकाससील इन्सान पार्टी ( व्हीआयपी ) चे प्रमुख मुकेश सहनी यांनी भाषण केले होते. व्हीआयपी हा पक्ष मच्छीमारांचा पक्ष समजला जातो. निवडणूक प्रचारावेळी राहुल आणि सहनी यांनी स्थानिक मच्छीमारांसोबत तलावात उतरुन मासेही पकडले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, बेगुसराय येथे काँग्रेसचा पराभव झाला होता.
बेगुसरायच्या शंख गावात महागठबंधनच्या पराभवासंदर्भात एका स्थानिकाने अजब तर्क सांगितला. वृ्त्तसंस्था आयएएनएसशी बोलताना तो म्हणाला की, ‘राहुल गांधी आले आणि मासे पकडे, परंतू त्यांनी मेलेले मासे पकडले होते. त्यामुळे त्यांना येथे मते मिळाली नाहीत. मते तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही काही सार्थक करता. सहनी समुदाय आपले मत तेव्हाच देतो जेव्हा त्यांना काही ठोस काम दिसते.’ त्यांनी असेही सांगितले की सहनी समुदायाची मते मिळण्यासाठी काँग्रेसला आरजेडीची सोबत सोडावी लागेल.
अन्य एका व्यक्तीने सांगितले की राहुल गांधी यांचा मासे पकडणे एक दिखावा पेक्षा जास्त काही नव्हते. राहुल गांधी आले आणि तलावात उडी मारली. परंतू जे मासे पकडले ते मेलेले मासे होते, बाजारात विकले जाणार नव्हते.
येथे पाहा व्हिडीओ –
Begusarai, Bihar: On the Mahagathbandhan’s defeat in Shankh village, Begusarai, a local says, “Rahul Gandhi came and caught fish, but they were dead fish, so he is not getting votes here. Votes are only earned when you do something meaningful. The Sahani community gives their… pic.twitter.com/xPrwSgAGj7
— IANS (@ians_india) November 16, 2025
एका अन्य व्यक्तीने सांगितले की निवडणूक हरण्याचे हे देखील कारण आहे की सर्वांनी लालू यादव यांचे सरकार पाहिलेले आहे. त्यांच्या कार्यकाळातील ‘जंगलराज’मध्ये सर्वसामान्य सुरक्षित नव्हते. मग ते मुकेश सहनी असो वा काँग्रेसचे राहुल गांधी त्यांनी त्या लोकांना सोबत आघाडी केली ज्यांना जनतेने आधीच अस्वीकार केले होते. हेच कारण आहे की बेगुसरायच्या लोकांनी मुकेश सहनी वा राहुल गांधी यांना पाठींबा दिला नाही.