Explainer: महिला ठरल्या गेमचेंजर, बिहारात साल 2010 ते 2025 महिलांचे मतदान किती टक्के वाढले?
बिहार विधानसभा निवडणूकात एनडीएचा मोठा विजय झाला आहे. या विजयात महिलांचा वाटा मोठा राहिला आहे. महिलांचे मतदानाची टक्केवारी देखील पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. नितीश कुमार यांची महिला धोरणे महिलांना मतदारांना आकर्षित करुन गेली असल्याचे स्पष्ट झाले.

पाटणा: बिहारच्या विधानसभा निवडणूकांत एनडीएला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. तर महागठबंधनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर बिहारात राहून अनेक वर्षे अभ्यास करुन बिहारचा कायापालट करण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय तज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्या ‘जनसुराज’ पक्षाचा मोठा पराभव होऊन एकही जागा मिळालेली नाही. या निवडणूकीत एनडीएच्या विजयात सगळ्या मोठा वाट महिला मतदारांचा राहिला आहे. महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांनी अधिक प्रमाणात गर्दी करुन मतदान केले आहे. या महिलांना एनडीएचा सायलेंट व्होटर म्हटले आहे. त्यामुळे महिलांची सुप्त शक्ती एनडीएला वरदान ठरली आहे. function loadTaboolaWidget() { ...
