Rajya Sabha Election 2022: मतमोजणी सुरु करा, काँग्रेस हायकमांडची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी, पण तक्रारीत महाराष्ट्राचा उल्लेख नाही

| Updated on: Jun 10, 2022 | 7:46 PM

Rajya Sabha Election : काँग्रेसचे नेतेही निवडणूक आयोगाकडे दाखल झाले. त्यांनीही आपली बाजू मांडली आणि तातडीने मतमोजणी सुरु करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्राचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी केला नसल्याचं पाहायला मिळालं.

Rajya Sabha Election 2022: मतमोजणी सुरु करा, काँग्रेस हायकमांडची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी, पण तक्रारीत महाराष्ट्राचा उल्लेख नाही
काँग्रेस शिष्टमंडळाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) मतदान पार पडलं. पण तिन राज्यातील मतमोजणी अद्याप सुरु झालेली नाही. कारण, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्रातून काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून भाजपने महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतलाय. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. तसंच दिल्लीतील भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेत आपली बाजू मांडली आहे. त्यानंतर काँग्रेसचे नेतेही निवडणूक आयोगाकडे (Election Commission) दाखल झाले. त्यांनीही आपली बाजू मांडली आणि तातडीने मतमोजणी सुरु करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्राचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी केला नसल्याचं पाहायला मिळालं.

मतमोजणी प्रक्रिया तातडीने सुरु करा- काँग्रेस

केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते म्हणाले की, आम्ही पाच लोक आता निवडणूक आयोगाकडे आलो होते. पी. चिदंबरम, रणदीप सुरजेवाला, भुपेश बघेल, हुड्डा, राजीव शुक्ला व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सहभागी होते. आम्ही आमचा मुद्दा निवडणूक आयोगासमोर ठेवला. आम्ही कायद्याच्या आधारे आमचा मुद्दा उपस्थित केला. आम्ही सांगितलं की रिटर्निंग ऑफिसर जो आहे त्याने फाईंडिक ऑफ फॅक्ट दिले आहे की त्यांनी तक्रारीचा अभ्यास केला. त्यात कुठल्याही प्रकारच्या प्रायव्हसीचं उल्लंघन झालेलं नाही. त्यामुळे त्याने ती तक्रार स्वीकारली नाही. तेच ऑब्जर्वरचंही मत आहे. त्यामुळे आमचं मत आहे की जी निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आहे ती तुम्ही तातडीने सुरु करा. तुमच्याकडे कुठलंही कारण नाही ती रोखून धरण्याचं.

निवडणूक आयोगाने आम्हा सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. कोणती त्रुटीच मिळाली नाही. तुम्ही विचार करा की एखाद्या वैयक्तिक तक्रारीनंतर काय निवडणूक थांबते का? मग अशा किती तक्रारी येतात लोकसभा, राज्यसभा, विधानसभा निवडणुकीत. त्यामुळे तक्रारीत काही ठोस नसेल, ऑब्जर्व्हरचा रिपोर्ट नसेल, रिटर्निंग ऑफिसरचा रिपोर्ट नसेल, आहेत ते रिपोर्ट काँग्रेसच्या बाजूने आहेत तर मतमोजणी रोखून धरण्यात काहीच अर्थ नाही. आमचं मत निवडणूक आयोगाने ऐकून घेतलं आहे. योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितल्याचं काँग्रेस नेते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राबाबत काँग्रेस नेते बोललेच नाहीत!

दरम्यान, टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीने काँग्रेस नेत्यांना तुम्ही हरियाणाबाबत बोलला, मात्र महाराष्ट्रातही तीन मतं रद्द करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. त्याबाबत आपलं मत काय? असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्याबाबत आपल्याला पूर्ण माहिती नाही. माहिती घेतल्यानंतरच आपण बोलू, असं काँग्रेस नेते म्हणाले.