राजपथावर अयोध्येच्या भव्य राम मंदिराला पहिला मान, उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक

| Updated on: Jan 28, 2021 | 4:48 PM

उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे (Republic Day Parade UPs Ram Mandir Tableau gets first Prize).

राजपथावर अयोध्येच्या भव्य राम मंदिराला पहिला मान, उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक
Follow us on

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत राजपथावर मोठा सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी कोरोना संकटामुळे तितका मोठा सोहळा आयोजित करण्यात आला नसला तरी विविध राज्यांच्या चित्ररथांचे सादरीकरण राजपथावर झाले. या चित्ररथांमधून त्या त्या राज्याच्या संस्कृतीचं दर्शन होतं. या चित्ररथांमध्ये कोणत्या राज्याचा पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक आला हे जाणून घेण्याची देखील अनेकांना उत्सुकता असते. यावर्षीदेखील तशीच उत्सुकता अनेकांना लागली होती. अखेर त्याचा निकाल समोर आला आहे. यावर्षी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे (Republic Day Parade UPs Ram Mandir Tableau gets first Prize).

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं जात आहे. या राम मंदिराच्या दर्शनासाठी जगभरातील भक्तांना आतापासूनच आस लागली आहे. मंदिराचं बांधकाम सुरु झालं आहे. दरम्यान, यावर्षी उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचा देखावा उभारण्यात आला होता. याशिवाय या चित्ररथावर वाल्मिक ऋषींचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. राम मंदिराचा देखावा आणि संगतीला सुरु असलेलं मधुर गाणं यामुळे अनेकांच्या नजरा या चित्ररथाकडे खिळून राहिल्या होत्या. अखेर उत्तर प्रदेशाच्या चित्ररथाला पहिला क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर एक पाऊल पुढे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम, त्रिपुराच्या चित्ररथाला द्वितीय आणि उत्तराखंडच्या चित्ररथाला तृतीय क्रमांक दिला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे माहिती संचालक शिशिर यांनी राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाल्याची माहिती ट्वविटरवर दिली आहे. यावेळी त्यांनी चित्ररथाच्या सर्व टीमचेस अभिनंदन केले. त्याचबरोबर गीतकार वीरेंद्र सिंह यांचे आभार मानले.

अयोध्याच्या राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या चित्ररथाची ही संकल्पना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूचवली होती. हा चित्ररथ दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर केले होते. याशिवाय “अयोध्या सितारामांची, जी समतेचं संदेश देते, कला आणि संस्कृतीची भूमी, धन्य-धन्य उत्तर प्रदेश” असं योगी ट्विटरवर म्हणाले होते (Republic Day Parade UPs Ram Mandir Tableau gets first Prize).

हेही वाचा : आता पदवी, पदविकेसाठी ‘कालमर्यादा’ नाही; पुढील वर्षापासून ‘श्रेयांक बँक’ लागू होणार