BRICS Summit : ब्रिक्स शिखर परिषदेत तीन मोठे नेते एकत्र, जगाला नेमका संदेश काय?
आज ब्रिक्स शिखर परिषदेचा पहिला दिवस आहे. या शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेमधून एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्लादीमीर पुतिन आणि शी जिनपिंग हे दिसत आहेत.

भारत ब्रिक्स शिखर परिषदेचं यजमानपद भुषवत आहे. आज या शिखर परिषदेचा पहिला दिवस आहे. या शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे भारतामध्ये आले आहेत. व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंगच नाही तर इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान हे देखील या शिखर परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. शुक्रवारी दिल्लीमधून एक छायाचित्र समोर आलं होतं, ज्या छायाचित्राने संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं, या छायाचित्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांचा हात आपल्या हातात घेतला होता, सोबतच या छायाचित्रामध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन देखील दिसून आले. हा अमेरिकेसाठी देखील भारताचा एक प्रकारे स्पष्ट संदेश असल्याचं मानलं जात आहे.
दरम्यान आज ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी आणखी एक छायाचित्र समोर आलं आहे. ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे जगातील तीन बडे नेते एकत्र दिसून येत आहेत. एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले होते. परंतु त्यामध्ये त्यांना यश आलं नाही, त्यानंतर अमेरिकेकडून रशियावर निर्बंध घालण्यात आले, तसेच जे देश रशियासोबत व्यापार करतील त्यांच्यावर देखील आम्ही निर्बंध घालू अशी धमकी अमेरिकेनं दिली होती.
मात्र आता ब्रिक्स परिषदेमधून जो फोटो समोर आला आहे, त्या फोटोमुळे भारताची भूमिका आधोरेखीत झाली आहे. अमेरिकेला स्पष्ट संदेश गेला आहे. भारतच भारताचे धोरणं ठरवणार असा हा संदेश आहे. या फोटोमध्ये तीन शक्तिशाली देशांचे बडे नेते दिसून येत आहेत. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे तिनही नेते एकाच फोटोमध्ये दिसून येत आहेत. या शिखर परिषदेकडून संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.