Lalu Prasad Yadav | लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, शरीराची हालचाल बंद, दिल्लीत एम्स रुग्णालयात उपचार

लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे.

Lalu Prasad Yadav | लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, शरीराची हालचाल बंद, दिल्लीत एम्स रुग्णालयात उपचार
पाटण्यातील हॉस्पिटलमध्ये नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. सध्या ते दिल्लीत उपचार घेत आहेत.
| Edited By: | Updated on: Jul 07, 2022 | 5:01 PM

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचा प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती गंभीर असून दिल्लीतील एम्स (Delhi AIMS) रुग्णावयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बिहारमधून (Bihar) बुधवारी त्यांना दिल्लीत आणण्यात आलं. पाटण्यातील घरात पायऱ्या चढत असताना लालू प्रसाद यादव पडले होते. या घटनेत त्यांचा खांदा आणि पायाला गंभीर जखम झाली होती. पडल्यानंतर त्यांना तत्काळ पाटण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र लालू प्रसाद यादवांच्या प्रकृतीत फार सुधारण न झाल्याने त्यांना पाटण्याहून एअर अँब्युलन्सद्वारे त्यांना दिल्लीत आणलं गेलं. लालूंच्या शरीरात तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले असून अजूनही त्यांचे शरीर उपचारांना फार साथ देत नसल्याची माहिती हाती आली आहे.

शरीराची हालचाल बंद?

लालू प्रसाद यादव यांना दिल्लीत आणल्यानंतर त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी माहिती दिली. एम्समधील डॉक्टरांना लालू प्रसाद यादव यांच्या आजारांबद्दल आधीपासून माहिती होती. त्यामुळे त्यांना पाटण्याहून दिल्लीत आणलं गेलं. लालूंच्या शरीरात तीन ठिकाणी फ्रॅक्चर झालंय. औषधांच्या ओव्हरडोसमुळे लालूंची प्रकृती आणखी ढासळली असल्याचं बोललं जातंय. आज सकाळी लालूंच्या शरीराची हालचाल बंद झाली होती. त्यांचं शरीर पूर्णपणे लॉक झाल्यासारखी स्थिती होती. त्यामुळे त्यांच्या तत्काळ इतर तपासण्या करण्यात आल्या.

देशभरात चाहत्यांच्या प्रार्थना

लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. सोशल मीडियावरदेखील लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बरी होण्यासाठी देवाकडे साकडं घातलं जात आहे.

हेमंत सोरेन यांची दिल्ली विमानतळावर भेट

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिल्ली विमानतळावर लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले.

लालू प्रसाद यादव यांच्या स्नुषा आणि तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री यादव ट्विटरवर लालूंचा एक हसरा फोटो ट्विट केला आहे.