AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 हजारांची लॉटरी लागताच बनला हा पहिला बोलपट, थिएटरबाहेर प्रचंड गर्दी, ठेवण्यात आला बंदोबस्त, कमाई पाहून…

95 वर्षांपूर्वी 14 हजार रुपयांची लॉटरी लागताच निर्मात्यांनी बनवला पहिला बोलपट. फक्त रात्री व्हायचे शूटिंग. प्रदर्शित होताच ठरला हाऊसफुल. थिएटरबाहेर ठेवण्यात आला होता बंदोबस्त.

14 हजारांची लॉटरी लागताच बनला हा पहिला बोलपट, थिएटरबाहेर प्रचंड गर्दी, ठेवण्यात आला बंदोबस्त, कमाई पाहून…
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 12, 2026 | 5:02 PM
Share

1931 India First Talking Film: भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट असे आहेत ज्यांनी संपूर्ण इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलून टाकला. जवळपास शंभर वर्षांपूर्वी आलेला ‘आलम आरा’ हा असा चित्रपट होता ज्याने भारतीय सिनेमात मोठा टप्पा गाठला. त्या काळात बहुतांश चित्रपट मूक म्हणजे साइलेंट असायचे.

कलाकार केवळ हावभाव आणि इशाऱ्यांच्या माध्यमातून कथा सांगत असत. मात्र ‘आलम आरा’मुळे पहिल्यांदाच पडद्यावर कलाकारांचे संवाद आणि गाणी ऐकायला मिळाली. त्यामुळेच हा चित्रपट भारतीय सिनेमातील पहिला बोलपट चित्रपट म्हणून ओळखला जातो.

या चित्रपटाचे दिग्दर्शन पारशी वंशाचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अर्देशीर इराणी यांनी केले होते. त्या काळात ध्वनी रेकॉर्डिंगची तंत्रज्ञान नवीन असल्यामुळे चित्रपट तयार करणे अत्यंत कठीण होते. बाहेरील आवाज रेकॉर्डिंगमध्ये आला की संपूर्ण सीन पुन्हा शूट करावा लागत असे. त्यामुळे कलाकारांना संवाद अतिशय काळजीपूर्वक बोलावे लागत.

रेल्वे ट्रॅकजवळील स्टुडिओमुळे रात्री होत असे शूटिंग

‘आलम आरा’च्या शूटिंगशी संबंधित एक रंजक किस्सा देखील प्रसिद्ध आहे. हा चित्रपट मुंबईतील GT Road परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ असलेल्या स्टुडिओमध्ये चित्रित करण्यात आला होता. दिवसा रेल्वेगाड्यांचा आवाज इतका मोठा असायचा की रेकॉर्डिंग करणे जवळजवळ अशक्य होत असे. त्यामुळे संपूर्ण टीमला रात्री शूटिंग करावे लागत असे. अनेकदा चित्रपटाचे चित्रीकरण रात्री 1 वाजल्यापासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत केले जात असे. जेणेकरून बाहेरील आवाज रेकॉर्डिंगमध्ये येऊ नये.

त्या काळातील मायक्रोफोन खूप मोठे आणि जड असायचे. त्यामुळे ते थेट कॅमेऱ्यासमोर ठेवणे शक्य नव्हते. म्हणून सेटवर विविध ठिकाणी मायक्रोफोन लपवले जात. चित्रपटातील संगीतकारांनाही कॅमेऱ्यापासून दूर राहावे लागायचे. काही वेळा ते पडद्यामागे किंवा झाडांच्या आड लपून हार्मोनियम आणि तबला वाजवत असत, जेणेकरून आवाज रेकॉर्ड होईल पण ते स्क्रीनवर दिसणार नाहीत.

लॉटरीच्या पैशातून सुरू झाली निर्मिती

असेही सांगितले जाते की दिग्दर्शक अर्देशीर इराणी यांच्याकडे चित्रपट तयार करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. एकदा त्यांना सुमारे 14 हजार रुपयांची लॉटरी लागली आणि त्याच पैशातून त्यांनी ‘आलम आरा’ची निर्मिती सुरू केली.

सुमारे 40 हजार रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट मुंबईतील मॅजेस्टिक सिनेमा येथे प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर थिएटरबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले होते.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?