आई मी तुला निवांत फोन करतो… लेफ्टनंट शुभम कुमार यांचा आईसोबतचा तो फोन ठरला शेवटचा..
आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर AN-32 हे मालवाहू विमान कोसळले. या अपघातात सहा जवानांना वीरमरण आले. या घटनेने एकच खळबळ उडाली. आता या अपघातानंतर मोठी माहिती पुढे येत आहे.

भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. शनिवारी सकाळी ही दुघर्टना घडली. आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हे विमान उतरत असताना अपघात झाला. हवाई दलाचे AN-32 हे मालवाहू विमान तळावर उतरत असताना कोसळले. हा अपघात इतका जास्त भीषण होता की, विमान कोसळताच थेट विमानाची दोन तुकडे झाली. धूर आणि आगीचा भडका दूरपर्यंत दिसत होता. विमान कोसळल्यानंतर मोठा आवाजही झाला. विमानाचा अपघात होताच तातडीने बचाव कार्य राबवण्यात आले. भारतीय हवाई दलाने या विमान अपघाताची माहिती दिली. N-32 हे एक मालवाहू विमान होते. उतरत असताना या विमानाचा अपघात झाला. हा अपघात नक्की कसा झाला, याबाबत काही फार माहिती पुढे येऊ शकली नाही. पण तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात सांगितले जात आहे.
बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील बनवारिया गावासाठी 13 जून हा दिवस काळा ठरला. आसाममधील जोरहाट येथे AN-32 हे विमान कोसळल्याने भारतीय वायुदलाचे फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार यांना वीरमरण आले. शुभम कुमार यांच्यासोबतच या विमान अपघातात वायुदलातील पाच जवानांनी देशासाठी प्राण अर्पण केले. शुभम कुमार यांच्या निधनाची बातमी कळताच बनवारिया गावात शोककळा पसरली.
त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगल कोसळला. आसामच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी शुभम कुमार यांच्या आईने त्यांना फोन केला होता. यादरम्यान व्हिडीओ कॉलमध्ये आईला बोलताना शुभम कुमार यांनी म्हटले होते की, मी आता थोडा व्यस्त आहे. मी आरामला पोहोचल्यानंतर तुम्हाला कॉल करतो, असे म्हणत शुभम कुमार यांनी फोन कट केला. मात्र, तो त्यांच्या कुटुंबियांसोबतचा शेवटा फोन ठरला.
आसाममध्ये विमान उतरताच मोठा अपघात झाला आणि शुभम कुमार शहीद झाले. शुभम कुमार 2021 मध्ये भारतीय वायुसेनेत अधिकारी म्हणून रूजू झाले होते. देश सेवा अगोदर म्हणत त्यांनी लग्न करण्यासही नकार दिला होता. शुभम यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
